मणिपूरमध्ये बहुजातीय संघर्षांमुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती काँग्रेस सरकारांच्या सदोष धोरणांमुळे आहे. असंही सरमा यांनी सांगितलं आहे.
विशेष प्रतिनिधी
गुवाहाटी : मणिपूरमधील हिंसाचार व महिलांवर अत्याचाराच्या घटनेवरून काँग्रेस मणिपूरचे भाजपा सरकार आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहे. त्याचवेळी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काँग्रेसच्या आक्रमकतेला प्रत्युत्तर दिले आहे. मुख्यमंत्री सरमा यांनी सात ट्विट करून काँग्रेस सरकार काळातील मणिपूरमध्ये घडलेल्या हिंसाचाराची आठवण करून दिली आहे. Chief Minister Himanta Sarma hits back at Congress in Manipur violence case
मुख्यमंत्री सरमा म्हणाले, “काँग्रेस अचानक मणिपूरमध्ये कमालीचा स्वारस्य दाखवत आहे. राज्यात अशाच घटनांबाबत तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काय प्रतिक्रिया दिली हे पाहणे महत्त्वाचे आहे. काँग्रेस पक्षाचा दुटप्पीपणा चिंताजनक आहे. यूपीए सरकारच्या काळात मणिपूर ही देशाची नाकेबंदीची राजधानी बनली होती. 2010-2017 दरम्यान, जेव्हा काँग्रेसने मणिपूरवर राज्य केले तेव्हा दरवर्षी 30 दिवसांपासून ते 139 दिवसांपर्यंत नाकेबंदी होत होती. 2011 मध्ये मणिपूरमध्ये 120 दिवसांपेक्षा जास्त काळ सर्वात वाईट नाकेबंदी होती.’’
याचबरोबर तत्कालीन मनमोहन सिंग सरकार आणि यूपीए अध्यक्षांवर हल्लाबोल करताना मुख्यमंत्री सरमा म्हणाले की, ‘’2011 मध्ये मणिपूर जळत होते तेव्हा तत्कालीन पंतप्रधान आणि यूपीए अध्यक्षांनी त्या 123 दिवसांत एक शब्दही उच्चारला नाही. त्यावेळी ते खासगी कंपन्यांना वाचवण्यात व्यस्त होते. वस्तुस्थिती अशी आहे की 2004-2014 या काळात काँग्रेसचे देश आणि राज्यात सत्ता असताना मणिपूरमध्ये 991 हून अधिक नागरिक आणि सुरक्षा कर्मचारी मारले गेले. परंतु मे 2014 पासून अशा आकडेवारीत 80 टक्के घट झाली आहे.’’
हिमंता म्हणाले, “मणिपूरमध्ये बहु-जातीय संघर्षांमुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती काँग्रेस सरकारांच्या सदोष धोरणांमुळे आहे. सात दशकांच्या कुशासनातून जन्माला आलेल्या दोषरेषा सुधारण्यास वेळ लागेल. 2014 पासून, मणिपूरच्या सामाजिक जडणघडणीत कमालीची सुधारणा झाली आहे.”
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App