उत्तराखंडमधील सर्व मदरशांची पाहणी करण्याचे मुख्यमंत्री धामी यांचे निर्देश

सर्व मदरशांची पडताळणी करण्यात यावी आणि कुठेही अनैतिक कृत्य समोर आल्यास तत्काळ… असेही म्हटलं आहे.

विशेष प्रतिनिधी

देहराडून  : उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सोमवारी नैनिताल जिल्ह्यातील वीरभट्टी येथील एका बेकायदेशीर मदरशात मुलांशी होत असलेल्या कथित अमानवी वागणुकीची दखल घेत अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) यांना राज्यातील सर्व मदरशांची पडताळणी करण्याचे निर्देश दिले. Chief Minister Dhamis instructions to inspect all Madrasahs in Uttarakhand

अपर मुख्य सचिवांना दिलेल्या सूचनांमध्ये मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात सुरू असलेल्या सर्व मदरशांची पडताळणी करण्यात यावी आणि कुठेही अनैतिक कृत्य समोर आल्यास तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी.

C-Voterचा ओपिनियन पोल: मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणामध्ये काँग्रेस, राजस्थानात भाजपला मिळू शकते सत्ता, मिझोराममध्ये त्रिशंकूची शक्यता

या संदर्भात गृह विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. रविवारी एका पालकाच्या तक्रारीवरून पोलिसांच्या पथकाने नैनितालमधील जिओलीकोटजवळील वीरभट्टी येथे सुरू असलेल्या या मदरशाला भेट दिली. या मदरशात कथित शारिरीक अत्याचारासह मुलांवर अमानुष वागणूक झाल्याची प्रकरणे नोंदवली गेली. मुलांची प्रकृती ठीक नसून त्यांना शुद्ध अन्न व पाणी दिले जात नसल्याचेही समोर आले आहे. नोंदणीशिवाय मदरसा सुरू असल्याचेही उघड झाले.

Chief Minister Dhamis instructions to inspect all Madrasahs in Uttarakhand

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात