Kamaltai Gavai : सरन्यायाधीशांच्या मातोश्री RSSच्या व्यासपीठावर जाणार; राजेंद्र गवई यांनी दिला दुजोरा; वैचारिक मतभेद – परस्पर संबंध वेगवेगळे

Kamaltai Gavai

विशेष प्रतिनिधी

नागपूर : Kamaltai Gavai  सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री तथा माजी राज्यपाल दिवंगत रा. सू. गवई यांच्या पत्नी कमलताई गवई ह्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सवाला हजेरी लावणार असल्याची माहिती त्याचे सुपुत्र डॉक्टर राजेंद्र गवई यांनी दिली आहे. कमलताई गवई यांनी संघाचे निमंत्रण स्वीकारले आहे. संघाशी वैचारिक मतभेद असले तरी एकमेकांच्या कार्यक्रमांना जाणे हे विचारांचा स्वीकार करणे नसते, असे राजेंद्र गवई यांनी या प्रकरणी ठणकावून सांगितले आहे.Kamaltai Gavai

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अमरावती महानगरतर्फे 5 ऑक्टोबर रोजी विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई यांना देण्यात आले आहे. त्यानुसार त्यांचे नाव कार्यक्रम पत्रिकेवरही छापण्यात आले आहे. पण त्यानंतर कमलताईंनी संघाच्या कार्यक्रमाला येण्यास कधीच होकार दिला नाही, हे संघाचे षडयंत्र आहे, आपण पक्क्या आंबेडकरवादी आहोत, असे स्पष्टीकरण दिल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे याविषयी संभ्रमावस्था निर्माण झाली. पण आता रिपब्लिकन पक्षाचे नेते तथा कमलताईंचे चिरंजीव डॉक्टर राजेंद्र गवई यांनी एका व्हिडिओद्वारे आपल्या मातोश्री संघाच्या कार्यक्रमाला जाणार असल्याची पुष्टी केली आहे.Kamaltai Gavai



काय म्हणाले राजेंद्र गवई?

कमलताई गवई यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी सोहळ्याचे निमंत्रण मिळाले आहे. त्यांनी ते स्वीकारले आहे. त्यानुसार त्या या कार्यक्रमाला जाणार आहेत. यापूर्वी या कार्यक्रमाला दिवंगत नेते राजाभाऊ खोब्रागडे, दादासाहेब गवई यांनी हजेरी लावली होती. गवई कुटुंबाचे आतापर्यंत सर्वांशी पक्षविरहित संबंध राहिलेले आहे. त्यामुळे आईसाहेबांनी संघाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले आहे.

आमचे वडील गवई साहेबांचे प्रत्येक पक्षात संबंध होते. दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी त्यांचे नजिकचे संबंध होते. गंगाधर फडणवीस यांच्याशीही त्यांचे भावासारखे संबंध होते. पण वैचारिक मतभेद वेगळे होते. एकमेकांच्या कार्यक्रमांना गेले पाहिजे. केवळ कार्यक्रमाला गेल्यामुळे आपण त्यांची विचारधारा स्वीकारतो असे नाही. आम्ही विचारधारेचे पक्के आहोत.

भूषण गवई सरन्यायाधीश झाल्यामुळे अनेक लोकांच्या पोटात दुखत आहे. त्यामुळे काहीजण आमच्यावर चुकीची टीका करत आहेत. पण अशा लोकांकडे दुर्लक्ष करणे हेच उत्तम राहील, असे राजेंद्र गवई यांनी म्हटले आहे.

रविवारी कमलताईंचे हस्तलिखित पत्र झाले होते व्हायरल

उल्लेखनीय बाब म्हणजे माजी राज्यपाल दिवंगत रा. सू. गवई हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष होते. दीक्षाभूमीच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यामुळे त्यांच्या पत्नी कमलताई गवई ह्या संघाच्या कार्यक्रमाला हजर राहणार असल्यामुळे अनेकांनी डोळे वटारले होते. याविषयी रविवारी दिवसभर सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्यानंतर कमलताई यांच्या नावाने एक हस्तलिखित पत्र व्हायरल झाले होते. त्यात त्यांनी आपण संघाच्या कार्यक्रमाला हजर राहणार नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच यासंबंधीची बातमी धादांत खोटी असल्याचाही दावा केला होता. त्यामुळे हे प्रकरण निवळल्याचे चित्र निर्माण झाले. पण आता राजेंद्र गवई यांच्या माहितीमुळे हा वाद पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

CJ Gavai’s Mother Kamaltai Gavai to Attend RSS Event; Son Confirms Despite Ideological Differences

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात