Chhangur Baba : छांगूर बाबाच्या 3 कोटीच्या हवेलीवर बुलडोझर; 20 खोल्या आणि हॉल पाडले; योगी म्हणाले- लोक लक्षात ठेवतील अशी शिक्षा देणार

Chhangur Baba

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : Chhangur Baba उत्तर प्रदेशातील धर्मांतराचा सूत्रधार जमालुद्दीन उर्फ ​​छांगूर बाबा याच्यावर मंगळवारी मोठी कारवाई करण्यात आली. बलरामपूरमधील त्याच्या ४० खोल्यांच्या आलिशान हवेलीवर ९ बुलडोझर चालवण्यात आले.Chhangur Baba

संध्याकाळी ५ वाजेपर्यंत, हवेलीतील २० खोल्या आणि ४० फूट लांब आणि तेवढाच रुंद हॉल पाडण्यात आला. आता बुधवारी सकाळी १० वाजता पुन्हा खोल्या पाडल्या जातील. हवेलीत ७० हून अधिक खोल्या आणि हॉल आहेत. त्यापैकी ४० खोल्यांचा भाग बेकायदेशीर घोषित करण्यात आला आहे.Chhangur Baba

एटीएसचा दावा आहे की, छांगूर बाबा येथून धर्मांतराचे नेटवर्क चालवत असे. तथापि, हा बंगला त्याची प्रेयसी नीतू उर्फ ​​नसरीन हिच्या नावावर आहे. बाबाने स्वतः नीतूचे धर्मांतर करून तिचे नाव नसरीन ठेवले.



योगी म्हणाले, आरोपी जलालुद्दीनच्या कारवाया केवळ समाजविरोधी नाहीत, तर देशविरोधी देखील आहेत. आरोपी आणि त्याच्या टोळीशी संबंधित सर्व गुन्हेगारांची मालमत्ता जप्त केली जाईल आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. समाज लक्षात ठेवेल अशी कायद्यानुसार शिक्षा दिली जाईल.

तीन एकर जमिनीवर किल्ल्यासारखी हवेली

ही हवेली उत्तौला-मानकापूर मुख्य रस्त्यावर आहे. सुमारे ३ कोटी रुपये खर्चून ३ बिघा जमिनीवर बांधण्यात आली आहे. त्यात १० सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. हवेलीभोवतीच्या भिंतीवर तारा टाकण्यात आल्या होत्या. रात्रीच्या वेळी त्यातून विद्युत प्रवाह जात असे जेणेकरून कोणीही कुठूनही आत येऊ नये. मुख्य प्रवेशद्वारापासून हवेलीपर्यंत जाण्यासाठी ५०० मीटरचा खासगी रस्ता बांधण्यात आला आहे.

मंगळवारी सकाळी १० वाजता प्रशासनाचे पथक घरात पोहोचले, तेव्हा मुख्य दरवाजा बंद होता. डीएम पवन अग्रवाल आणि अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पथकाने कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील प्रत्येक खोलीची झडती घेण्यात आली.

उत्तौला तहसीलदार सत्यपाल प्रजापती म्हणाले की, बेकायदेशीर बांधकाम हटविण्यासाठी १७ मे आणि १७ जून आणि ७ जुलै रोजी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. परंतु, त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे प्रशासनाने बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचा निर्णय घेतला.

शनिवारी, एटीएसने लखनौ येथून नीतू उर्फ ​​नसरीनसह ५०,००० रुपयांचे बक्षीस असलेल्या छांगूर बाबाला अटक केली. एटीएसने नोव्हेंबर २०२४ मध्ये लखनौमध्ये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

छांगूर बाबाचे लक्ष्य होत्या हिंदू मुली

तपास यंत्रणांनुसार, छांगूर बाबा मुलींना आमिष दाखवून धर्मांतर करण्यास भाग पाडत असे. त्याचे लक्ष्य हिंदू मुली होत्या. प्रत्येक जातीच्या मुलींसाठी त्याचे दर निश्चित होते.

उदा.- ब्राह्मण, सरदार आणि क्षत्रिय मुलींना १५ ते १६ लाख रुपये देण्यात आले.
मागास जातीतील मुलींना १० ते १२ लाख रुपये दिले जात होते.
इतर जातीतील मुलींना ८ ते १० लाख रुपये देण्यात आले.

Chhangur Baba Haveli Demolished, Yogi Vows Strict Punishment

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात