विशेष प्रतिनिधी
मुंबई : Nafed राज्यात कांद्याचा गहन प्रश्न समोर उभा राहत असतानाच आणि सध्या कांद्याचे भाव उतरलेले असताना नाफेडने कांदा बाजारात आणल्यामुळे कांद्याचे भाव आणखी पडले आहेत. कांद्याला सरासरी १४०० ते १५०० रुपये भाव असताना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) यांनी बफर स्टॉकचा कांदा बाजारात आणल्यामुळे कांद्याचे भाव आणखी खाली आले आहेत आणि यामुळे शेतकरी हवालदिल झाला असल्याची माहिती राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांना दिली.Nafed
राज्य सरकारच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: केंद्रासोबत बोलणार असुन शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नसल्याचे देखील यावेळी छगन भुजबळ यांनी सांगितले..Nafed
ग्राहक फायदा, पण शेतकऱ्यांना फटका
शेतकऱ्यांच्या कांद्याला दर मिळत नसताना दुसरीकडे केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून आता सवलतीच्या दरात कांदा विक्री सुरू केली आहे. ग्राहकांना कांदा सहज उपलब्ध व्हावा, यासाठी दिल्ली, मुंबई आणि अहमदाबाद,चेन्नई, गुवाहाटी आणि कोलकाता या शहरांमध्ये या शहरांत २४ रुपये किलो या किफायतशीर दराने कांदा विक्री सुरू करण्यात आली आहे. बाजारात आवक वाढल्यास दर आणखी खाली येण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना फायदा होणार असला तरी शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली.
डिसेंबरपर्यंत सुरू राहणार विक्री प्रक्रिया
राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) केंद्रीय भांडार यांच्या माध्यमातून ज्या शहरांत कांद्याचे दर ३० रुपये किलोपेक्षा जास्त आहेत, त्या शहरांमध्ये २४ रुपये किलो दराने कांदा विकला जाणार आहे. डिसेंबरपर्यंत ही विक्री प्रक्रिया सुरू राहणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App