प्रभू श्रीरामाबद्दल जाहीर कार्यक्रमात अपमानास्पद आणि वादग्रस्त टिप्पणी केल्याने सर्वचस्तरातून टीका सुरू आहे.
विशेष प्रतिनिधी
राजस्थानमधील अशोक गहलोत यांच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या चतराराम देशबुंध या महाशयाने एका जाहीर कार्यक्रमात प्रभू श्रीरामाबद्दल अतिशय अपमानजनक आणि वादग्रस्त विधान केलं. काँग्रेस पक्षच प्रभू श्रीरामाच्या अस्तित्वावर वेळोवेळी प्रश्न उपस्थित करत आलेला आहे, आता त्यांचे नेते आणि मंत्री अशी वादग्रस्त विधानं करताना दिसत आहेत. Chatraram Deshbandhu Minister of State in Rajasthan Controversial Statement About Lord Sri Rama
‘’रामचंद्राबद्दल नेहमी म्हटलं जातं की मर्यादापुरुषोत्तम राम की जय… आणि म्हणतो की त्याच्या सारखा वाईट माणूस जगात जन्मालाच नाही. आपल्या पत्नीला जिने १४ वर्षे वनवासात धक्के खाल्ले आणि याने पाच मिनिटांत तिला तुझ्या पोटातील मूल कोणाचे आहे म्हणत घराबाहेर काढले. त्याला तुम्ही कसं काय मर्यादापुरुषोत्तम म्हणू शकता?’’ असं संतापजनक वक्तव्य एका कार्यक्रमात जाहीरपणे करताना चतराराम देशबंधू दिसत आहेत.
चतराराम देशबंधू (राज्यमंत्री दर्जाप्राप्त) राज्य विमुक्त घुमंतू आयोगाचे उपाध्यक्ष आहेत. त्यांनी अशाप्रकारे विधान करून प्रभू रामासह समस्त हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रियाही उमटत आहेत आणि राजस्थानमधील काँग्रेस सरकार, मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावर टीका केली जात आहे.
https://youtu.be/MojS3y9fekg
याशिवाय, राजस्थान भाजपाने काँग्रेसचं खरं रूप दर्शवण्यासाठी हा वादग्रस्त व्हिडीओ फेसबुक पेजवर शेअर केला आहे. आणि काँग्रेसला प्रभू श्रीरामाचा द्वेष का?, हिंदू देवी-देवतांचा अपमान करणे काँग्रेस नेत्याचे चारित्र्य बनले आहे, असं भाजपाने म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App