नौदल उभारण्याचा पहिला मान शिवरायांनाच; अमित शाह यांचे गौरवोद्गार; शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे भूमिपूजन

वृत्तसंस्था

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांनी न्याय, समाजकल्याण आणि स्वसंरक्षणासाठी डावपेच आखले. केवळ सैन्यच उभारले नाही तर सैन्याचे आधुनिकीकरण सुद्धा केले. तसेच पहिले नौदल उभारण्याचा मान हा शिवाजी महाराजांनाच जातो, असे गौरवोद्गार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काढले. Chatrapati Shivaji maharaj was the first king to build a navy; Amit Shah; Bhumi Pujan of the statue of Shivaji Maharaj

रविवारी पुणे महापालिकेला शाह यांनी भेट दिली. या वेळी महापालिकेच्या प्रांगणातील हिरवळीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे भूमिपूजन शहा यांच्या हस्ते झाले. महापालिकेच्या विस्तारित इमारतीच्या प्रवेशद्वारापाशी बसविलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरणही त्यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते.



 

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांनी देशाला दिशा दिलेली आहे. दैनंदिन जीवनात काम करत असताना या दोन्ही महापुरुषांच्या वाटेवरून वाटचाल करणे, हे प्रेरणादायी आहे. म्हणूनच महापालिका म्हणून पुणेकरांसाठी काम करत असताना या दोन्ही महापुरुषांचे पुतळे असावेत, ही मनोमन इच्छा होती. जी आता पूर्णत्वास जात असताना मनस्वी समाधान आहे, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

chatrapati Shivaji maharaj was the first king to build a navy; Amit Shah; Bhumi Pujan of the statue of Shivaji Maharaj

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात