विशेष प्रतिनिधी
ऋषिकेश – चारधाम पुरोहितांच्या संघटनेने उत्तराखंडमधील आगामी विधानसभा निवडणूकीत उडी घेतली आहे. चारधाम तिर्थ-पुरोहीत हक हकुकधारी महापंचायत समितीचे अध्यक्ष कृष्णकांत कोटीयाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, सर्वसाधारण सभेत हा निर्णय झाला.Chardham Prist will contest election
१५ जागी आम्ही उमेदवार उभे करू, पण इतर अनेक जागी व्युहात्मक पातळीवर त्यांचा प्रभाव राहील.देवस्थान मंडळाविरुद्ध जनमत तयार करण्यासाठी मोहिम उघडण्याची घोषणाही त्यांनी केली.
याबाबत ते म्हणाले की, गेल्या अडीच हजार वर्षांपासून आमच्या हक्कांवर गदा आणून देवस्थान मंडळे स्थापन करण्याची परंपरा सुरु होती. भाजपने ती मोडीत काढली. याविषयीच आम्ही जनजागृती करू. आगामी अधिवेशनादरम्यान राज्य विधानसभा इमारतीला घेराव घालण्यात येईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App