विशेष प्रतिनिधी
अमृतसर : काँग्रेसकडून नवज्योत सिंग सिद्धू यांची काँग्रेस निवडणूक समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यावरून कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्री चरणजीत सिंग यांनाच इशारा दिला आहे. आता चन्नी नाईट वॉचमन बनूनच राहतील असे त्यांनी म्हटले आहे.Charanjit Singh Channy is now only a night watchman, after Sidhu was made the chairman of the Congress election committee. Criticism of Amarinder Singh
चन्नी म्हणाले, मला त्यांच्याबद्दल वाईट वाटतं. क्षमता असूनही त्यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासमोर दुय्यम वागणूक दिली जात आहे. चन्नी आता फक्त नाईट वॉचमन बनूनच राहतील. मुख्यमंत्र्यांना प्रदेशाध्यक्षांपेक्षाही दुय्यम दर्जा मिळण्याचा प्रकार याआधी कधीच घडला नाही.
कोणत्याही स्वाभिमानी नेत्यानं अशी मानहानी सहन करता कामा नये. चरणजीत सिंग चन्नी हे फक्त अनुसूचित जातीची मतं मिळवण्यासाठी शोपीस होते का? कुणीतरी बालिश मुलाप्रमाणे वागतंय
आणि दिवसरात्र नवनव्या मागण्या करतंय, म्हणून तुम्ही त्याच्या सर्व मागण्या मान्य करताय आणि असं करताना चांगलं काम करणाºया तुमच्या मुख्यमंत्र्यांची मानहानी करत आहात. काँग्रेस आता गाळात जात आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App