चांद्रयान मोहिमेसाठी कैलास खेरचं खास गाणं

विशेष प्रतिनिधी

पुणे : कालचा दिवस हा प्रत्येक भारतीय साठी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस होता. साध्या सायकल पासून सुरू झालेला आपल्या इस्रो या संस्थेचा प्रवास,, अनेक शास्त्रज्ञांची मेहनत चिकाटी, संशोधकाचे संशोधन, तंत्रज्ञान आणि जिद्द या सगळ्याच्या जोरावर काल भारताने चंद्रावर महत्वकांक्षी चांद्रयान उतरवलं आणि सर्वत्र एकच जल्लोष झाला. Chandrayaan 3 successfully launched

चंद्रयान तीन चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अलगद उतरवणे हे इस्त्रो मधील नेतृत्व आणि शास्त्रज्ञाच्या एका पिढीचे यश आहे ही कामगिरी उत्तुंग आहे. याच इस्रोच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.

चंद्रयान तीन या मोहिमेसाठी बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून शास्त्रज्ञांचा उत्साह वाढावा यासाठी एक कविता पोस्ट केली आहे तर आर माधवन यांनी देखील आपल्या ट्विटच्या माध्यमातून इस्रोच्या शास्त्रज्ञांचे आभार मानले आहेत.

यानिमित्त बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी खास गाण लिहिलं असून आपल्याच आवाजात ते गायलही आहे. हे गाण त्यांनी भारतीयांना समर्पित केलं आहे.कैलाश खेरचं गाणतु जो चाह ले अगर कदमों मे तेरे हो शिखर… तू खुद पर यकीन कर, तू खुद पर यकीन करं….जब एकही मिली है जिंदगी, सोच मत चाहे आर हो या पार हो… तू ले जान वो असल जान है….जिसकी जान पर सौ सौ जाने निसार हो….असे या गाण्याचे बोल आहेत.

भारतीयांना संदेशहा माझा भारत, या वेळचा भारत. माझ्या भारतीयांनो हे तुमच्यामुळं मिळालं आहे त्यामुळं आपल्याला एकच जे जीवन मिळालं आहे, तर कुठलाही विचार करु नका आर हो या पार हो, असा संदेशही गायक कैलाश खेर यांनी दिला आहे.

Chandrayaan 3 successfully launched

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात