‘ज्ञानवापी’ सर्वेक्षणाच्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान!

allahabad high court directs asi to stop survey of gyanvapi masjid in varanasi

 अंजुमन इंतेजामिया मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अलाहाबाद उच्च न्यायालयाने आज एएसआयला ज्ञानवापी मशीद संकुलाच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाची परवानगी दिली आहे. मात्र अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या या आदेशाला आव्हान देण्यासाठी अंजुमन इंतेजामिया मशीद समितीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.  Challenge to Allahabad High Courts decision of Gyanwapi survey

समितीच्या वकिलाने सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाचा उल्लेख करून एएसआयला सर्वेक्षण करण्याची परवानगी देऊ नये, असे सांगितले असल्याचे वृत्त आहे. त्याच वेळी, सर्वोच्च न्यायालयाने या समस्येवर लक्ष घालणार असल्याचे म्हटले आहे.

आज कोर्टात ज्ञानवापीच्या वैज्ञानिक पद्धतीद्वारे एएसआय सर्वेक्षणाविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. मशीद व्यवस्था समितीच्या याचिकेवर अलाहाबाद उच्च न्यायालयाने आज निकाल दिला.

उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या ASI सर्वेक्षणाचा आदेश प्रभावी झाला आहे. 27 जुलै रोजी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. मुस्लीम बाजूने, मशीद व्यवस्था समितीने, वाराणसी जिल्हा न्यायाधीशांच्या ASI सर्वेक्षणाच्या 21 जुलैच्या आदेशाला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

Challenge to Allahabad High Courts decision of Gyanwapi survey

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात