महायुतीत राहुन भुजबळांचा वेगळा सूर; भाजप किती मर्यादेपर्यंत सहन करेल??

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ लोकसभा निवडणूक सुरू झाल्यापासून ते महाराष्ट्रातले मतदान संपल्यानंतरही महायुतीमध्ये राहून वेगळा सूर उमटवत आहेत. भुजबळांच्या या वेगळ्या सुरांमुळे महायुतीत विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात ठिणगी पडल्याच्या बातम्या आल्या आहेत. लोकसभा निवडणूक संपायच्या आत विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाची ठिणगी पडणे पडणे भाजपच्या राजकारणासाठी अजिबात अपेक्षित नाही. त्यामुळे महायुतीला सगळ्यात मोठा पक्ष भाजप हा वेगळा सूर कुठल्या मर्यादेपर्यंत सहन करेल??, असा सवाल तयार झाला आहे. Chagan bhujbal plays different tune in mahayuti, will BJP accept it??

महायुतीमध्ये राहून नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर लढवायची होती. त्यांनी तशी तयारी देखील केली होती, पण त्यांचा मुकाबला फक्त भाजपशी नव्हता, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेशी होता. कारण नाशिकचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले होते. अर्थात सुरुवातीला छगन भुजबळांनी आपल्याला थेट भाजपच्या वरिष्ठांचा आशीर्वाद असल्याने आपणच नाशिकची लोकसभेची जागा लढवणार, असे जाहीररित्या सांगून टाकले होते. परंतु भुजबळांनी आपल्याला भाजपच्या वरिष्ठांचा आशीर्वाद आहे असे सांगणे निराळे आणि भाजपच्या वरिष्ठांनी त्या आशीर्वादावर शिक्कामोर्तब करणे निराळे!!

प्रत्यक्षात भुजबळांनी भाजपचा वरिष्ठांचा आशीर्वाद आहे असे सांगून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी तसा दबाव “वर्क” होऊ शकला नाही. याचा अर्थ एकनाथ शिंदे यांनी शांतपणे भुजबळांचा तो दबाव झुगारून टाकला होता.



वास्तविक छगन भुजबळांसाठी भाजपचे कुठले वरिष्ठ नेते उघडपणे बोलण्याचे काही कारणच नव्हते. तसे ते बोलले देखील नाहीत. कारण भाजपने ज्या 417 जागांवर आपले उमेदवार कमळ चिन्ह उभे केले, त्यापैकी एकाही उमेदवाराला आमचा आशीर्वाद आहे असे जाहीररित्या भाजपच्या कुठल्याच वरिष्ठ नेत्याने सांगितलेले नव्हते. अशा स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळ यांच्यासारख्या नेत्याला आपला आशीर्वाद आहे असे भाजपचे कुठलेच वरिष्ठ नेते जाहीरपणे सांगण्याची शक्यता नव्हती. तसे त्यांनी सांगितलेही नाही. त्यामुळे भुजबळच आपल्या वक्तव्यात फसले आणि नाशिक लोकसभेची संभाव्य उमेदवारी घालवून बसले.

वास्तविक भुजबळ महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सर्वात ज्येष्ठ मंत्री आहेत. त्यांनी वयाची 75 ओलांडली आहे. त्यांच्यासारख्या नेत्याने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा आशीर्वाद आहे हे बोलणे खरं म्हणजे टाळायला हवे होते. त्यांनी ते टाळले नाही. त्याचा “फटका” त्यांना बसला आणि लोकसभेची उमेदवारी गेली, असे मानण्यास वाव आहे.

पण इतके सगळे घडूनही भुजबळांना नाशिकची उमेदवारी मिळाली नसल्याची सल मनात ठेवता आली नाही. आज मुंबईतल्या गरवारे क्लब मध्ये त्यांनी वेगळ्या प्रकारे ती सल बोलून दाखवलीच. लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला कमी जागा मिळाल्या त्या आपल्याला स्वीकाराव्या लागल्या, पण विधानसभा निवडणुकीत तसे होऊ नये. आपल्याला महायुतीत प्रवेश करतानाच भाजपने 80 – 90 जागा देण्याचे आश्वासन दिले आहे हे आपण लक्षात ठेवून त्यांच्याकडून तेवढ्या जागा मिळाव्यात, अशी मागणी केली पाहिजे, अशी सूचना भुजबळ यांनी केली. अजित पवारांनी ही भुजबळांच्या सूचनेला दुजोरा दिला.

पण छगन भुजबळ फक्त राष्ट्रवादीच्या 80 – 90 जागा मागूनच थांबले नाहीत. त्यांनी मोदींची 400 पारची घोषणा महाराष्ट्रात नडली, असे वक्तव्य केले. मोदींनी 400 पारची घोषणा दिली. त्यामुळे विरोधकांना हे संविधान बदलायला निघालेत, अशी टीका करण्याची संधी मिळाली आणि आपल्याला बॅकफूटवर जावे लागले, असा दावा भुजबळांनी केला. भुजबळांनी मोदींच्या सगळ्यात मोठ्या घोषणेला वेगळा सूर लावून आक्षेप घेतला. इथेच भुजबळ किंबहुना राष्ट्रवादी यांचा वेगळा सूर भाजप सहन करेल का??, असा सवाल तयार झाला.

पण मूळात लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातले फक्त मतदान पार पडले आहे. मतमोजणी अजून व्हायची आहे. अशा स्थितीत नेमका कोणता पक्ष प्रबळ हे ठरायचे आहे असे असताना भुजबळांनी 80 – 90 जागांचा पत्ता खोलून राष्ट्रवादीचीच गोची करून घेतल्याचे दिसत आहे. वास्तविक महायुतीत भाजप मोठा पक्ष आहे. अर्थातच तोच पक्ष विधानसभेच्या सर्वाधिक जागा लढवणार हे उघड आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या विमानतळावर हीच बाब नेमकेपणाने अधोरेखित करून सांगितली किंबहुना भुजबळांच्या वक्तव्यामुळे त्यांना ती संधी मिळाली.

पण भुजबळांच्या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये विधानसभा जागा वाटपाबाबत ठिणगी पडल्याच्या बातम्या आल्या. माध्यमांना या बातमी देण्याची संधी मिळाली. अर्थात हे सगळे भुजबळांना समजत नाही असे मानणे राजकीय असमंजसपणाचे ठरेल, पण तरी देखील भुजबळ भाजपशी जुनाच काँग्रेसी स्टाईलच्या राजकारणाचा खेळ करत असतील, तर भाजप भुजबळांना महायुतीत ठेवून तसला “खेळ” किती सहन करू शकतील??, हा खरा सवाल आहे.

भुजबळांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीत राहून काँग्रेसशी वेगवेगळे दबावाचे “खेळ” करण्याची सवय आहे. काँग्रेसची अवस्था गेली कित्येक वर्ष गलितगात्र असल्याने राष्ट्रवादीचे असले “खेळ” त्या पक्षाच्या नेत्यांना सहन करावे लागले आहेत, पण भाजपची ती स्थिती नाही. आत्ताचा भाजप वाजपेयींचा भाजप नसून, तो मोदींचा भाजप आहे. त्यामुळे भुजबळांचे काँग्रेसी स्टाईलचे “खेळ” भाजपचे नेते किती किती मर्यादेपर्यंत सहन करतील की भुजबळांनाही कळणार पण नाही, असा धोबीपछाड देतील, हे लवकरच दिसून येण्याची दाट शक्यता आहे!!

Chagan bhujbal plays different tune in mahayuti, will BJP accept it??

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात