वृत्तसंस्था
नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाला आळा घालण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. पण सगळीकडे साधनांची आणि मनुष्यबळाचीही कमतरता जाणवतेय. त्यातही रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन सिलिंडर यांची कमतरता हा देशभर चर्चेचा आणि राजकीय वादाचा विषय ठरतो आहे.Centre developing oxygen generation plants in hospitals across country to deal with shortage: Dr Harsh Vardhan
या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ऑक्सिजनच्या तुडवड्यावर केंद्र सरकार उपाययोजना करीत असल्याची महत्त्वाची माहिती दिली आहे. देशभरातील मोठ्या आणि मध्यम हॉस्पिटल्समध्ये जिथे शक्य असेल,
तिथे तातडीने ऑक्सिजन प्लँट्स सुरू करण्याला केंद्र सरकारने प्राधान्य दिले आहे. औद्योगिक वापराचा ऑक्सिजन कमी करून तो वैद्यकीय वापराकडे आधीच वळविण्यात आला आहे.त्यात भर म्हणून हॉस्पिटलमध्येच ऑक्सिजन निर्मिती प्लँट्स तयार करण्याला प्राधान्य देण्यात आल्याचे डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले आहे.
११ राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर एएनआय वृत्तसंस्थेला त्यांनी कोरोना स्थितीची सविस्तर माहिती दिली. गेल्या वर्षी १ लाख सिलिंडर्स केंद्र सरकारने ते राज्यांना गरजेनुसार मोफत वितरित केलेच.
आता याही वर्षी १ लाख सिलिंडर विकत घेऊन ते राज्यांना मोफत देण्यात येतील. शिवाय त्यांची वाहतूक कोणत्याही अडथळ्याविना पार पडेल, असे डॉ. हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले आहे.विविध राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांनी ऑक्सिजन वाहतूकीविषयी चिंता व्यक्त केल्यानंतर त्याची केंद्र सरकारने तातडीने दखल घेतल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शनच्या किमती घटविल्या
आता वेगवेगळ्या कंपन्यांच्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या किमती घटविल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. देशभर ८९९ रूपये ते ३,४९० रूपये याच दरम्यान राहणार आहेत. त्यांची यादी आणि किमतीचा तक्ता केंद्रातल्या रसायन आणि खते मंत्रालयाने जारी केला आहे.
या एकूण ७ कंपन्या आहेत, की ज्यांनी किमती घटविल्या आहेत. रेमडेसिवीर इंजेक्शनच्या काळा बाजार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App