केंद्र सरकारने शेअर केले पंतप्रधानांच्या विदेश दौऱ्यातील उपलब्धीचे फोटो, 2023 मध्ये परदेशातील अचीव्हमेंट्स

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 2023 मध्ये भेट दिलेल्या देशांची छायाचित्रे शेअर केली आणि म्हटले, “त्यांनी ‘ग्लोबल गुड’ आणि अधिक समावेशक, बहु-पक्षीय जगासाठी प्रयत्न केले.” पंतप्रधान मोदी हे 26 वर्षांत इजिप्त, 40 वर्षांत ग्रीस आणि पापुआ गिनीला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले. 2023 मध्ये फ्रान्सच्या लीजन ऑफ ऑनरसह 6 देशांनी त्यांचा गौरव केला.Central Govt Shares Photos of Prime Minister’s Foreign Tour Achievements Abroad Achievements in 2023



या शिवाय पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने गेल्या वर्षभरात विविध जागतिक उपक्रमांचे सारथ्य केले. ज्यातून जागतिक शाश्वत विकासाचे नवे आयाम रचण्यात आले. यात इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स, ग्लोबल बायोफ्यूएल अलायन्स, ग्रीन क्रेडिट इनिशिएटिवह आणि इंडिया मिडल ईस्ट युरोप कॉरिडॉर यांचा समावेश आहे.

या शिवाय पीएम मोदींच्या या दौऱ्यातून भविष्यावर सकारात्मक परिणाम करणारे करार करण्यातही भारताला यश आल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे. मुत्सद्देगिरीच्या बाबतीत 2023 हे वर्ष भारताचे भविष्यवादी वाल्ट्झ म्हणून चिन्हांकित झाले!

यूएसएसह गंभीर आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानावरील पुढाकार (iCET) पासून अंतराळ संशोधनासाठी आर्टेमिस अॅकॉर्ड्सच्या वैश्विक उपक्रमापर्यंत. सेमीकंडक्टर सिम्फनी आणि फ्रान्समधील यूपीआयसाठी सामंजस्यपूर्ण करार इत्यादींचा यात समावेश आहे.

पंतप्रधानांच्या दौऱ्याचे फलित म्हणून अनेक महत्त्वाचे प्रभाव समोर आले आहेत.

  • मायक्रॉन यांनी भारतात नवीन सेमीकंडक्टर सुविधेमध्ये 825 मिलियन डॉलरची गुंतवणूक जाहीर केली.
  • बोईंग आणि एअर इंडियासह महत्त्वपूर्ण करार झाले.
  • ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया येथे भारतीय वाणिज्य दूतावास जाहीर झाले.
  • पॅसिफिक बेट राष्ट्रांमध्ये एसएमई विकास प्रकल्प सुरू करण्याची घोषणा झाली

Central Govt Shares Photos of Prime Minister’s Foreign Tour Achievements Abroad Achievements in 2023

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात