जाणून घ्या केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव काय म्हणाले आहेत?
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : गुगलने बिले न भरणाऱ्या भारतीय ॲप डेव्हलपर्सवर कारवाई केली आहे. गुगलने 10 भारतीय कंपन्यांचे ॲप प्ले स्टोअरवरून काढून टाकले आहेत. सरकारने कडक भूमिका घेतली असून गुगल आणि प्ले स्टोअरवरून हटवलेल्या ॲप्सबाबत पुढील आठवड्यात बैठक घेणार आहे, जेणेकरून वाद मिटवता येईल.Central governments strict stance on removing Indian apps from Google Play Store
ते म्हणाले की, सरकारने गुगलच्या प्रतिनिधींना बैठकीसाठी बोलावले आहे, कंपनीला ॲप काढण्याची परवानगी दिली जाणार नाही. ते म्हणाले की आमची स्टार्टअप प्रणाली व्हायब्रेंट आहे, आम्ही ती सुरक्षित करण्यासाठी शक्य ते सर्व पाऊल उचलू.
या प्रकरणाचे लवकर निराकरण होण्याची आशा व्यक्त करताना, आयटी मंत्री म्हणाले, “मला आशा आहे की गुगल त्याचा योग्य विचार करेल. आमची स्टार्टअप प्रणाली व्हायब्रेंट आहे आणि त्यांच्या हिताचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे.’ ते म्हणाले की, गुगलने यूपीआयसारख्या भारतीय तंत्रज्ञानाचा अतिशय चांगल्या पद्धतीने अवलंब केला आहे. ते म्हणाले की, मला खात्री आहे की गुगल हे प्रकरण चांगल्या प्रकारे सोडवेल. बैठकीत गुगलसोबत या मुद्द्यावर चर्चा केली जाईल.
गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरून Shaadi.com, Naukri.com, 99 acres.com सारखे लोकप्रिय ॲप्स काढून टाकले आहेत. सर्च इंजिन कंपनी गुगल प्ले स्टोअरचे म्हणणे आहे की या ॲप डेव्हलपर्सनी त्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नाही, या सेवांसाठी अद्याप पेमेंट केलेले नाही, त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. shadi.com चे संस्थापक आणि शार्क टँकशी संबंधित अनुपम मित्तल यांनी गुगलच्या या हालचालीला इंटरनेटसाठी काळा दिवस म्हटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App