Vaccination : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण अभियान चालवले जात आहे. ड्रोनद्वारे लस देशाच्या दुर्गम भागात पोहोचविण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. दुर्गम व अवघड रस्त्यांमुळे देशातील काही भागांत लसी वेळेवर पोहोचत नाहीत. अशा परिस्थितीत सरकारने एक मोठा आराखडा बनवून हा उपक्रम सुरू केला आहे. आयआयटी कानपूरने केलेल्या संशोधनातून हे शक्य झाले आहे. Central government is preparing to deliver the vaccines by drone For Vaccination in remote areas
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण अभियान चालवले जात आहे. ड्रोनद्वारे लस देशाच्या दुर्गम भागात पोहोचविण्यासाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. दुर्गम व अवघड रस्त्यांमुळे देशातील काही भागांत लसी वेळेवर पोहोचत नाहीत. अशा परिस्थितीत सरकारने एक मोठा आराखडा बनवून हा उपक्रम सुरू केला आहे. आयआयटी कानपूरने केलेल्या संशोधनातून हे शक्य झाले आहे.
इंडिया मेडिकल रिसर्च कौन्सिलच्या वतीने एचएलएल इन्फ्रा टेक सर्व्हिसेस लिमिटेडनेही 11 जून रोजी मानवरहित हवाई वाहने किंवा ड्रोनद्वारे लस देण्यासाठी या निविदांना आमंत्रित केले आहे. कंपनीनेही अर्ज भरला आहे. आता फक्त तेलंगणामध्ये ड्रोनद्वारे लस देण्याचे काम सुरू आहे.
एचएलएलने सांगितले की, हे ड्रोन 100 मीटर उंचीवर कमीतकमी 35 किमी अंतराचे हवाई अंतर कापण्यास सक्षम असावेत. याव्यतिरिक्त ते कमीतकमी 4 किलो वजन उचलून केंद्रावर परत येण्यास सक्षम असावेत. पॅराशूटवर आधारित डिलिव्हरीला प्राधान्य दिले जाणार नाही, असेदेखील एचएलएलने स्पष्ट केले आहे. आयआयटी-कानपूरच्या सहकार्याने आयसीएमआरने या संदर्भात संशोधन केले आहे. यामध्ये कोरोनाची लस ड्रोनच्या माध्यमातून देशाच्या दुर्गम भागात पोहोचवता येऊ शकते का हे पाहिले गेले आहे.
दोन महिन्यांपूर्वी नागरी उड्डयन मंत्रालय आणि नागरी उड्डयन संचालनालयाने (डीजीसीए) आयसीएमआरला ड्रोनद्वारे कोरोना लसीच्या वितरणाचा अभ्यास करण्यास मान्यता दिली होती. आयसीएमआरने या प्रकल्पासाठी आयआयटी-कानपूरशी भागीदारी केली आहे. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, आयसीएमआरला देण्यात आलेली ही सूट एका वर्षासाठी वैध आहे.
Central government is preparing to deliver the vaccines by drone For Vaccination in remote areas
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App