वृत्तसंस्था
नवी दिल्ली – मुंबईचे बदली केलेले पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी राजीनामा द्यावा लागलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटींच्या खंडणीखोरीची चौकशी करण्यासाठी सीबीआयची टीम एनआयएच्या कार्यालयात पोहोचली आहे. Central Bureau of Investigation (CBI) officials arrive at NIA office CBI is investigating the allegations of former Mumbai police commissioner Param Bir Singh
सुप्रिम कोर्टाने अनिल देशमुख आणि ठाकरे – पवार सरकार यांचे अर्ज फेटाळल्यानंतर देशमुखांच्या १०० कोटींच्या चौकशीचा मार्ग मोकळा झाल्याने सीबीआयच्या तपासाला वेग आला आहे. सीबीआयचे अधिकारी सकाळी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या कार्यालयात दाखल झाले होते. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेले वाहन तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा एनआयए तपास करत आहे.
निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे सध्या एनआयएच्या कोठडीत असून परमबीर सिंह यांनी पत्राच्या माध्यमातून केलेल्या आरोपांत सचिन वाझेंचाही उल्लेख आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सीबीआय एनआयएच्या तपासात समोर आलेली माहिती गोळा करत आहे.
Mumbai: Central Bureau of Investigation (CBI) officials arrive at NIA office. CBI is investigating the allegations of former Mumbai police commissioner Param Bir Singh against former Maharashtra Home Minister Anil Deshmukh. pic.twitter.com/1Q5Z5dm1v3 — ANI (@ANI) April 9, 2021
Mumbai: Central Bureau of Investigation (CBI) officials arrive at NIA office.
CBI is investigating the allegations of former Mumbai police commissioner Param Bir Singh against former Maharashtra Home Minister Anil Deshmukh. pic.twitter.com/1Q5Z5dm1v3
— ANI (@ANI) April 9, 2021
परमवीर सिंग आणि अनिल देशमुख हे दोघेही राज्य सरकार आणि प्रशासनामध्ये उच्च पदांवर कार्यरत होते. दोघांनी मतभेद होण्यापूर्वी एकत्र काम केलेले आहे. या प्रकरणातील उच्चपदस्थ आणि झालेले गंभीर आरोप पाहता स्वतंत्र चौकशी पाहिजे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळताना नमूद केले. आरोप करणारी व्यक्ती परमवीर सिंग हे अनिल देशमुखांचे शत्रू नव्हे तर एकेकाळचे अनिल देशमुखांचे उजवे हात होते. उच्च न्यायालयाने निर्देश दिले तेव्हा देशमुख मंत्री होते असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App