मोदी वारंवार बोलताहेत ईडी – सीबीआयची कारवाई थांबणार नाही; तरी विरोधकांना वेगळी स्ट्रॅटेजी का सापडत नाही??


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला अमेरिका आणि इजिप्तचा यशस्वी दौरा आटोपून आल्यावर थेट 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली, ती सुद्धा बड्या धमाक्यात!! मोदींनी आज भाजपच्या 10 लाख बूथ कार्यकर्त्यांना संबोधित करून त्यांच्याबरोबर प्रश्नोत्तर रुपी संवाद साधला. यातले दोन “टेक अवे” असे, की बूथ कार्यकर्त्यांनी सेवाभावाने मतदारांकडे जावे. त्यांची छोटी मोठी कामे करावीत. केंद्र सरकारची आणि राज्य सरकारची कामे, योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात, अशी अपेक्षा मोदींनी व्यक्त केली, तर दुसरा मुद्दा अर्थातच विरोधी ऐक्याचा होता. या संदर्भात मोदींनी ठाम भूमिका स्पष्ट केली, ती म्हणजे घराणेशाही पक्षांविरुद्धची भाजपची लढाई थांबणार नाही आणि त्या पलीकडे जाऊन ज्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराच्या केसेस आहेत, त्यांच्याविरुद्धची कायदेशीर कारवाई म्हणजेच ईडी अथवा सीबीआयची कारवाई थांबणार नाही!! Central agencies don’t stop legal actions despite opposition cry, but why opposition don’t find another strategy to fight with Modi??

अपराध बोध नाही

पण मोदी आज जे बोलले, ते नवे नाही. याआधी सीबीआयच्या एका कार्यक्रमात मोदींनी केंद्रीय तपास संस्थांच्या सर्व अधिकाऱ्यांना अपराध बोधात राहण्याची जरुरत नाही. तुम्ही तुमचे काम करत राहा. तुम्ही ज्यांच्या विरुद्ध काम करत आहात, ते या देशातल्या सिस्टीम मधले फार बडे लोक आहेत. या सिस्टीम मध्ये कोणते दोष आहेत, याची त्यांना पक्की माहिती आहे. त्यामुळे ते तुमच्यावर दबाव आणतील म, पण तरी देखील तुम्ही दबावाखाली येऊ नका. कारण केंद्र सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. तुम्ही अपराध बोधात राहू नका. जी योग्य आहे, ती कायदेशीर कारवाई करा, असे स्पष्ट बोल त्यांनी केंद्रीय तपास संस्थांच्या अधिकाऱ्यांना ऐकावले होते.

त्यानुसारच आजही वेगवेगळ्या राज्यांमध्ये दररोज ईडी, सीबीआय अथवा एनआयए या केंद्रीय तपास संस्थांचे काम आणि छापे सुरू असल्याच्या बातम्या येतात. या छाप्यांमधून कोट्यवधी रुपयांच्या रकमासमोर येतात. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट यांचे छापे थांबलेले नाहीत.

विरोधकांची वातावरण निर्मिती

अशा स्थितीत 2019 पासून सर्व विरोधक मोदीविरुद्ध केंद्रीय तपास संस्थांच्या गैरवापराची वातावरण निर्मिती करत आहेत. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, एनआयची कारवाई झाली की दररोज पत्रकार परिषदा घेऊन मोदींवर आणि केंद्रीय तपास संस्थांवर आगपाखड करत आहेत. तरी देखील कारवाई थांबलेली नाही.

तामिळनाडू, पश्चिम बंगाल यांच्यासारख्या राज्यांनी केंद्रीय तपास संस्थांच्या तपास आणि चौकशी कामात अडथळे आणण्याचे प्रयत्न केले. पण ते तितके यशस्वी होऊ शकले नाहीत.

मिलियन डॉलर क्वेश्चन

याचा अर्थ मोदींची केंद्रीय तपास संस्थांमार्फत सुरू असलेली कायदेशीर धडक कारवाई जशीच्या तशी सुरू आहे, तर मग विरोधकांना फक्त पत्रकार परिषदा घेऊन केंद्रीय तपास संस्थाविरुद्ध आरडाओरडा करून कारवाई थांबवता येत नसेल, तर त्यांना मोदींविरुद्ध लढण्याची वेगळी स्ट्रॅटेजी का सापडत नाही??, “मिलियन डॉलर क्वेश्चन” आहे!!

आत्तापर्यंत विरोधकांनी मोदीविरोधात कमी राजकीय प्रयोग केलेले नाहीत. त्याचबरोबर 2019 च्या निवडणुकीनंतर झालेल्या प्रत्येक विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळालेच असेही नाही. उलट तामिळनाडू पश्चिम बंगाल मध्ये आणि आत्ता कर्नाटकात भाजपला अपयश आले, तरी देखील या अपयशाने खचून अथवा धडा घेऊन मोदींकडून केंद्रीय तपास संस्थांची कायदेशीर कारवाई थांबलेली नाही. याचा अर्थ काय घ्यायचा??, हे विरोधकांना उमगते का?? हा खरा प्रश्न आहे.

विरोधकांना तोडच सापडत नाही

मोदी घराणेशाही पक्षांची पाळेमुळे खणून काढण्याच्या मागे आहेत. ते त्यांनी उघड जाहीर केले आहे. विरोधक सातत्याने मोदींवर कितीही आणि कोणतेही आरोप करत असले, तरी मोदी त्या आरोपांना बधत नाहीत. कायदेशीर कारवाई मागे घेत नाहीत, हे मोदींचे “शक्तिस्थळ” आहे आणि विरोधक मात्र रोज त्याच त्याच राजकीय हत्यारांनी मोदींना झोडपण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधकांना केंद्रीय तपास संस्थान विरोधातल्या कायदेशीर कारवाई विरुद्ध खऱ्या अर्थाने “तोड”च सापडलेली नाही!!… अन्यथा काँग्रेस किंवा बाकीच्या प्रादेशिक पक्षांच्या वर्षानुवर्षे सत्तेवर राहिलेल्या मुरब्बी नेत्यांना “तोड” सापडत नाही, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे, पण ही वस्तुस्थिती आहे, की मोदींविरोधात राजकीय लढाई लढण्यासाठी विरोधकांच्या हातात अजून परिणामकारक “राजकीय हत्यार” आलेले नाही. ते केंद्रीय तपास संस्थांविरुद्धच ओरडा करत राहतात आणि मोदींची कायदेशीर कारवाई सुरू राहते, हेच आजचे वास्तव आहे.

– कायदेशीर कारवाईला वेग

मोदींच्या आजच्या भाषणातून ही कायदेशीर कारवाई वेग पकडण्याचाच इशारा त्यांनी दिला आहे. त्यात त्यांनी कुठलाही आड पडदा ठेवलेला नाही. त्यामुळे देशातले गांधी – मुलायम – लालू – पवार – ममता – करुणानिधी केसीआर असे कितीही घराणेशाही पक्षाचे बडे नेते आपापल्या राज्यांमध्ये अथवा केंद्रामध्ये राजकीय डिंग्या मारोत, त्यांना कायदेशीर कारवाईचा बडगा सहन करावाच लागणार आहे. मोदींशी लढण्याचा परिणामकारक मार्ग सापडल्या शिवाय कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याखेरीज त्यांना दुसरा पर्याय नाही!!… मोदींच्या आजच्या भाषणातला हा सर्वात मोठा “टेक अवे” आहे!!

Central agencies don’t stop legal actions despite opposition cry, but why opposition don’t find another strategy to fight with Modi??

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात