मन की बातचे शतक, केंद्र सरकार जारी करणार 100 रुपयांचे नाणे, त्यावर लिहिलेले असेल ‘मन की बात 100’

प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ कार्यक्रमात रेडिओवरून संबोधित करतात. यात ते भारतातील नागरिकांशी संवाद साधतात. लवकरच या कार्यक्रमाचे 100 भाग पूर्ण होणार आहेत. यानिमित्त 100 रुपयांचे नाणे जारी करण्यात येणार आहे. नाण्यावर ‘मन की बात 100’ लिहिलेले असेल. नाण्यावर मायक्रोफोनदेखील तयार केला जाईल आणि 2023 कोरले जाईल.Centenary of Mann Ki Baat, Central Govt to issue Rs 100 coin, ‘Mann Ki Baat 100’ written on it

30 एप्रिल रोजी पीएम मोदींच्या ‘मन की बात’चा 100 वा भाग प्रसारित होणार आहे. याबाबत भाजपकडूनही विशेष तयारी सुरू आहे. भाजपने एक लाखांहून अधिक बूथवर कार्यक्रम प्रसारित करण्याची योजना आखली आहे. यासोबतच हा कार्यक्रम जगभर प्रसारित व्हावा, अशी पक्षाची इच्छा आहे. नरेंद्र मोदींची लोकप्रियता जगभरात आहे, म्हणूनच हा कार्यक्रम जगभर प्रसारित व्हायला हवा, असे भाजपचे म्हणणे आहे.



मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधान मोदींनी आजवर भारतातील अनेक दुर्लक्षित पैलू, व्यक्तिमत्त्वे आणि त्यांचे महान कार्य यावर प्रकाश टाकला आहे. देशाच्या एखाद्या कानाकोपऱ्यातील व्यक्तीची दखल घेऊन त्याचे कार्य देशासमोर आणण्याचे कामही पंतप्रधानांच्या या कार्यक्रमामुळे झाले आहे. पीएम मोदींनी उल्लेख केलेल्या जवळपास सर्वच व्यक्तींकडून काही ना काही प्रेरणा मिळते, अशा प्रतिक्रिया सर्वसामान्यांनी वेळोवेळी व्यक्त केलेल्या आहेत.

Centenary of Mann Ki Baat, Central Govt to issue Rs 100 coin, ‘Mann Ki Baat 100’ written on it

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात