Mumbai : मुंबईत CBIचा छापा; लाच प्रकरणात 2 IRSसह 7 अधिकारी अटकेत, 40 कोटींच्या प्रॉपर्टीची कागदपत्रे जप्त

Mumbai

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Mumbai  कथित लाचखोरीच्या रॅकेटप्रकरणी सीबीआयने बुधवारी मुंबईत छापे टाकून दोन आयआरएस अधिकाऱ्यांसह सात जणांना अटक केली. सहविकास आयुक्त सीपीएस चौहान आणि उपविकास आयुक्त प्रसाद वरवंटकर या अधिकाऱ्यांसह ७ जणांचा समावेश आहे.Mumbai



सांताक्रूझ इलेक्ट्रॉनिक्स एक्स्पोर्ट प्रोसेसिंग झोन येथे लाचखोरी घोटाळ्यात कथित सीबीआयने १७ डिसेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत २७ स्थावर मालमत्तेची कागदपत्रे तसेच आरोपींच्या निवासस्थानी ३ वाहने सापडली. चौहानकडून ४० कोटी रुपयांच्या २५ मालमत्तेची कागदपत्रेही जप्त केली. रेखा नायर यांच्या घरातून ६१.५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सिप्ज सेज मुंबई येथे नियुक्त अधिकारी जागावाटप, आयात केलेल्या मालाची विल्हेवाट लावणे, शुल्क न भरता बाजारात आयात मालाची विक्री, मर्जी राखणे या बाबींमध्ये सिप्जमधून काम करणाऱ्या पक्षांकडून मध्यस्थांमार्फत अवाजवी फायदा घेत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

आरोपींची नावे

आयआरएस अधिकारी सहविकास आयुक्त सीपीएस चौहान, उपविकास आयुक्त डॉ. प्रसाद वरवंटकर, सहायक विकास आयुक्त रेखा नायर, सहायक विकास आयुक्त मनीषकुमार, सहायक अधिकारी रवींद्रकुमार, वरिष्ठ लिपिक राजेशकुमार, अधिकारी संजीवकुमार मीणा या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मनोज जोगळेकर व मिथिलेश तिवारी या व्यक्तींचा समावेश.

CBI raids Mumbai; 7 officials including 2 IRS officers arrested in bribery case

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub