CBI कडे मणिपूर हिंसाचाराच्या आणखी 9 प्रकरणांचा तपास, एजन्सीकडे आता 17 केसेस, मेईतेई महिलेच्या गँगरेपचाही तपास शक्य


वृत्तसंस्था

इंफाळ : मणिपूर हिंसाचाराशी संबंधित आणखी 9 प्रकरणांची सीबीआय चौकशी करणार आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे की, तपास संस्थेकडे आता एकूण 17 प्रकरणे आहेत. सीबीआयने आतापर्यंत 8 गुन्हे नोंदवले आहेत, ज्यात मणिपूरमधील महिलांच्या कथित लैंगिक छळाच्या दोन प्रकरणांचा समावेश आहे. CBI probes 9 more cases of Manipur violence, agency now has 17 cases

सीबीआयकडे आणखी प्रकरणे येऊ शकतात, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यामध्ये विशेषतः महिलांच्या छेडछाडीच्या प्रकरणांचा समावेश असेल, कुकी महिलाचा व्हायरल झालेला व्हिडिओ. याशिवाय 9 ऑगस्ट रोजी मेईतेई महिलेवर सामूहिक बलात्काराचे प्रकरण समोर आले होते. त्याचा तपास सीबीआयकडेही दिला जाऊ शकतो.

3 मेपासून राज्यात कुकी आणि मेईतेई समुदायांमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारात 160 हून अधिक मृत्यू झाले आहेत. मणिपूरमध्ये 6523 एफआयआर नोंदवण्यात आल्याचे केंद्राने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले आहे. त्यापैकी 11 प्रकरणे महिला आणि मुलांवरील हिंसाचाराशी संबंधित आहेत.

सीबीआयसमोर अनेक आव्हाने

अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्यातील समाज जातीय आधारावर विभागला गेला आहे, अशा परिस्थितीत तपास यंत्रणेसमोर अनेक आव्हाने आहेत. सीबीआयवर पक्षपाताचा आरोपही केला जाऊ शकतो की, ती एखाद्या समुदायाशी संबंधित आहे. अशा स्थितीत अत्यंत गांभीर्याने पुढील तपास सुरू आहे.

SITच्या 42 टीम तपासात

सर्वोच्च न्यायालयाने 7 ऑगस्ट रोजी सांगितले होते की, 42 विशेष तपास पथके (एसआयटी) मणिपूरमधील हिंसाचाराच्या प्रकरणांची चौकशी करतील. या एसआयटीच्या कामावर डीआयजी दर्जाचा अधिकारी देखरेख करेल. हा अधिकारी मणिपूरच्या बाहेरचा असेल. डीआयजी दर्जाचा अधिकारी 6 एसआयटीचे निरीक्षण करेल. जिल्ह्याच्या आधारे या एसआयटी नियुक्त केल्या जातील.

मणिपूरमध्ये मेईतेई महिलेवर 3 मे रोजी सामूहिक बलात्कार

मणिपूरच्या चुराचंदपूर येथील मेईती महिलेने कुकी समुदायाच्या लोकांवर सामूहिक बलात्काराचा आरोप केला आहे. ही घटना 3 मे रोजी घडली, पोलिसांनी 9 ऑगस्ट रोजी एफआयआर नोंदवला. महिलेने पोलिसांना सांगितले की, नराधमांनी तिचे घर पेटवून दिले. विरोध केल्यावर गँगरेप केला. समाजाच्या भीतीपोटी ती आजवर आपल्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल कोणाशीही बोलली नव्हती.

मणिपूर हिंसाचारात आतापर्यंत 160 हून अधिक मृत्यू

मणिपूर हिंसाचारात आतापर्यंत 160 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी 3 ते 5 मेदरम्यान 59, 27 ते 29 मे दरम्यान 28 आणि 13 जून रोजी नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. 16 जुलै ते 27 जुलैपर्यंत कोणताही हिंसाचार झाला नाही.

CBI probes 9 more cases of Manipur violence, agency now has 17 cases

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात