50 लाख रुपये रोख, संशयास्पद कागदपत्रे, इलेक्ट्रिक रेकॉर्ड, लॅपटॉप, मोबाईल फोन आणि अनेक डेस्कटॉप जप्त
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने मानवी तस्करीच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. सीबीआयने सात राज्यांतील या रॅकेटच्या 10 ठिकाणी छापे टाकले. यादरम्यान 50 लाख रुपये रोख, संशयास्पद कागदपत्रे, इलेक्ट्रिक रेकॉर्ड, लॅपटॉप, मोबाईल फोन आणि अनेक डेस्कटॉप जप्त करण्यात आले आहेत. यासोबतच सीबीआयने अनेकांना ताब्यात घेतले आहे, या सर्वांची चौकशी सुरू आहे.CBI busts big human trafficking racket raids in 7 states
तपास यंत्रणेने म्हटले आहे की, आतापर्यंत या लोकांनी ३५ लोकांना नोकरीच्या बहाण्याने रशिया आणि युक्रेनमध्ये पाठवले असल्याचे तपासात समोर आले आहे. या रॅकेटची मोडस ऑपरेंडी उघड करताना सीबीआयने सांगितले की, हे लोक निरपराध तरुणांना परदेशात आकर्षक नोकऱ्या देण्याचे आमिष दाखवून त्यांना लक्ष्य करायचे. हे तस्कर एक संघटित नेटवर्क म्हणून काम करत आहेत आणि यूट्यूब इत्यादी सोशल मीडिया चॅनेलद्वारे आणि त्यांच्या स्थानिक एजंटद्वारे भारतीय नागरिकांना रशियामध्ये उच्च पगाराच्या नोकऱ्यांसाठी आमिष दाखवत होते.
या संदर्भात, बुधवारी खासगी व्हिसा सल्लागार कंपन्या आणि एजंट आणि इतरांविरुद्ध मानवी तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, सीबीआयने माहिती दिली. उत्तम रोजगार आणि जास्त पगाराच्या नोकऱ्यांच्या नावाखाली ते भारतीय नागरिकांची रशियात तस्करी करत असल्याचे आढळून आले आहे. या दलालांचे मानवी तस्करीचे जाळे देशभरातील अनेक राज्यांमध्ये पसरलेले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App