कर्ज फसवणूक प्रकरणात CBIची चंदा-दीपक कोचर यांच्याविरुद्ध कारवाई, पहिले आरोपपत्र केले दाखल

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर यांच्यावर आता कर्ज फसवणूकप्रकरणी कडक कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडिओकॉनचे प्रवर्तक वेणुगोपाल धूत यांच्याविरुद्ध पहिले आरोपपत्र दाखल केले आहे. सीबीआयच्या आरोपपत्रात याशिवाय आणखी सहा जणांची नावे आहेत.CBI action against Chanda-Deepak Kochhar, first charge sheet filed

वेणुगोपाल धूत यांनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या कंपनीत गुंतवणूक केली होती, असे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयचे म्हणणे आहे. त्या बदल्यात चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा गैरफायदा घेत व्हिडिओकॉन ग्रुपच्या कंपन्यांना बेकायदेशीरपणे कर्ज दिले होते.



धूत यांचे नातेवाईक, चार्टर्ड अकाउंटचे नावही समाविष्ट

कोचर आणि धूत यांच्याशिवाय सीबीआयच्या आरोपपत्रात चार्टर्ड अकाउंटंट आणि धूत यांच्या नातेवाईकाचीही नावे आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीबीआयने आरोपपत्र मुंबई सत्र न्यायालयाच्या रजिस्ट्रार कार्यालयात सादर केले आहे.

सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की छाननीनंतर आरोपपत्राची प्रत आरोपींना दिली जाईल. त्यानंतर विशेष सीबीआय न्यायालयासमोर हजर केले जाईल. सीबीआयशी संबंधित एका सूत्राचे म्हणणे आहे की चंदा कोचर यांच्यावर खटला चालवण्यासाठी आयसीआयसीआय बँकेची परवानगी मिळणे बाकी आहे. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत अशी मान्यता घेणेही बंधनकारक आहे. त्याचवेळी सीबीआयच्या विशेष न्यायालयाची दखल घेतल्यानंतरच कोचर आणि अन्य आरोपींविरुद्ध खटला सुरू होईल. या संदर्भात आयसीआयसीआय बँकेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

कोचर दांपत्याला डिसेंबरमध्ये झाली होती अटक

कर्ज फसवणूकप्रकरणी सीबीआयने कोचर दाम्पत्याला गेल्या वर्षी 23 डिसेंबर रोजी अटक केली होती. तर धूत यांना तीन दिवसांनी अटक करण्यात आली. याप्रकरणी पहिली एफआयआर 2019 मध्ये नोंदवण्यात आली होती.

हे प्रकरण व्हिडिओकॉन समूहाला 1,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जाचे कथित चुकीच्या वाटपाशी संबंधित आहे. अटकेनंतर मुंबई उच्च न्यायालयाने कोचर यांची 9 जानेवारीला, तर धूत यांची 20 जानेवारीला जामिनावर सुटका केली होती.

CBI action against Chanda-Deepak Kochhar, first charge sheet filed

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub