विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सायबर क्राईम चोरट्यांची मजल आता अगदी उपराष्ट्रपती यांनाही फसविण्यापर्यंत गेली आहे. तोतयेगिरीची कमाल करत एक जण आपण उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू असल्याचे भासवून व्हीआयपी लोकांना व्हॉटस अॅप मेसेज पाठवत असून, आर्थिक मदतीच्या नावाखाली पैसे उकळण्याचा प्रयत्न करीत आहे.Caution to public on fake social media ID of Hon’ble Vice President of India, M Venkaiah Naidu
उपराष्ट्रपतींच्या सचिवालयाने शनिवारी एक अधिकृत निवेदन जारी करून या तोतयापासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की, हा तोतया ९४३९०७३१८३ या क्रमांकावरून मेसेज पाठवत आहे. इतरही मोबाइल क्रमांकाचा वापर
त्याच्याकडून वापरण्यात येत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक व्हीआयपी व्यक्तींना त्याने असे मेसेज पाठवले आहेत. या तोतयापासून सर्वांनी सावध राहावे. या प्रकाराची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अधिकार्यांनाही देण्यात आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App