जातनिहाय जनगणनेत सर्व धर्मीयांचा समावेश; मुस्लिम आणि ख्रिश्चनांचीही जातनिहाय जनगणना होणार; देशावर परिणाम काय??

नाशिक : पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यातल्या संबंधांमध्ये तणाव वाढला असताना संपूर्ण देशाचेच नाही, तर जगाचे लक्ष भारत आणि पाकिस्तान यांच्या संभाव्य युद्धाकडे लागले होते. त्यासंदर्भात मोदी सरकारने अनेक निर्णय घेतले. पण त्या पलीकडे जाऊन आज एक “मास्टर स्ट्रोक” मारला, तो म्हणजे जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेऊन मोदी सरकारने काँग्रेस सकट सगळ्या विरोधकांच्या हातातले राजकीय हत्यार बोथट करून टाकले. Caste census

पण त्यापलीकडे जाऊन राष्ट्रीय जनगणनेत जातनिहाय जनगणनेचा समावेश करताना तो निर्णय सर्व धर्मीयांसाठी लागू केला‌‌. याचा अर्थच हिंदू, बौद्ध, जैन या धर्मीयांबरोबरच मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मियांमधल्या जातींची देखील जनगणना राष्ट्रीय जनगणनेत होणार आहे. काँग्रेस सह सर्व विरोधकांना हा सगळ्यात मोठा राजकीय धक्का आहे. Caste census

मोदी सरकारने देशात हिंदुत्वाचे वातावरण निर्माण केल्यानंतर त्याला छेद देण्यासाठी राहुल गांधींनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा तापवला होता. 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्या मुद्द्याच्या आधारे काँग्रेसला मर्यादित यश मिळाले होते, पण काँग्रेस पक्ष आणि विरोधक सत्तेवर येऊ शकले नव्हते. महाराष्ट्र, हरियाणा आणि दिल्ली या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला जबरदस्त मार खावा लागला होता. पण काँग्रेस सकट सगळ्या विरोधकांनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा सोडून दिला नव्हता.



या दरम्यानच्या काळात पहलगामचा हल्ला झाला आणि राजकारणाचा पट बदलला. भारत-पाकिस्तान तणाव पुन्हा ऐरणीवर आला. पाकिस्तान वर सूड उगवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय सैन्य दलांना संपूर्ण स्वातंत्र्य देऊन टाकले. त्यांच्यावरचे राजकीय बंधन दूर केले. या पार्श्वभूमीवर भारत आता पाकिस्तान वर कोणता आणि कसा हल्ला करणार याची चर्चा संपूर्ण देशात आणि जगात सुरू असताना मोदी सरकारने देशातल्या अंतर्गत विषयावर निर्णय घेऊन मास्टर स्ट्रोक मारला. मोदी सरकारने जातनिहाय जनगणना घेण्याचा निर्णय जाहीर केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कालच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी 7, लोककल्याण मार्ग या पंतप्रधानांच्या निवासस्थानी दीर्घकाळ चर्चा केली होती. ही चर्चा भारत पाकिस्तान यांच्यातल्या तणावा संदर्भात असल्याचा कयास माध्यमांनी बांधला होता पण प्रत्यक्षात आज वेगळाच महत्त्वपूर्ण निर्णय समोर आला.

जातनिहाय जनगणनेचा निर्णय हिंदू, बौद्ध, जैन यांच्या प्रमाणे मुस्लिम आणि ख्रिश्चनांनाही लागू होणार असल्याने काँग्रेस सकट सगळ्या विरोधकांच्या हातातले राजकीय हत्यार गळून पडणार आहे. केवळ बिहार आणि पश्चिम बंगाल या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे बोलले जात असले तरी प्रत्यक्षात जातनिहाय जनगणनेचा निर्णय अधिक खोलवर राजकीय आणि सामाजिक परिणाम करणारा ठरण्याची शक्यता आहे. याची तुलना करायचीच झाली, तर मंडल आयोगाच्या निर्णयाशी करता येऊ शकेल.

जातनिहाय जनगणने सर्व धर्मीयांच्या जातींचा आकडा समोर येणार असल्याने काँग्रेस आणि विरोधकांच्या मुस्लिम तुष्टीकरणाचा फुगा फुटायाची दाट शक्यता आहे. केवळ आता मुस्लिमांमधल्या वरिष्ठ अशरफ जातींचे तुष्टीकरण करून बाकीच्या सगळ्या मुस्लिम समाजाला राजकीय दृष्ट्या गंडवणे इथून पुढे जमण्याची शक्यता नाही. कारण अजलाफ आणि अरजाल म्हणजेच पसमांदा या गटांमधील दोन सर्वांत मोठ्या मुस्लिम समुदायांना आणि जातींना त्यांच्या लाभाचा वाटा लोकसंख्येच्या प्रमाणात द्यावा लागेल आणि इथेच देशाचे राजकारण 360° मध्ये फिरण्याची दाट शक्यता आहे.

– OBC आरक्षणात घुसखोरी बंद

मुस्लिम किंवा ख्रिश्चनांना OBC समुदायात घुसून मूळ OBC आरक्षण खाऊन टाकता येणार नाही. त्यामुळे OBC समुदायाचे आरक्षण सुरक्षित राहून त्याचा लाभ जास्तीत जास्त लोकांना होण्याची शक्यता आहे.

Caste census incorporate Muslims and Christians also

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात