‘कॅनडा भारतासोबत एकत्र काम करेल’ पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर जस्टिन ट्रूडोंचं विधान!

इटलीधील G-7 शिखर परिषदेदरम्यान झाली भेट


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मागील काही महिन्यांपासून भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंधांमध्ये तणाव आहे. दरम्यान, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी G-7 शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान झालेल्या संभाषणाचा उल्लेख केला आहे. ते म्हणाले की, दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये काहीसा तणाव असूनही त्यांनी भारतासोबत काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर एकत्र काम करण्याची वचनबद्धता व्यक्त केली आहे.Canada will work together with India Justin Trudeaus bill after meeting PM Modi

ट्रूडो यांनी इटलीत तीन दिवसीय G-7 शिखर संमेलनाच्या शेवटच्या दिवशी पत्रकार परिषदेत सांगितले की, “मला या आवश्यक, संवेदनशील विषयाच्या तपशीलात जायचे नाही, ज्यावर आम्हाला पुढे काम करणे आवश्यक आहे, परंतु भविष्यात एकत्र कारण्यासाठी हा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा असेल, यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.”



याआधी शुक्रवारी मोदींनी सोशल मीडियावर ट्रूडोंसोबतचा एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये दोन्ही नेते हस्तांदोलन करताना दिसत होते. मोदींनी त्यांच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते, ‘G7 शिखर परिषदेत कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांची भेट झाली.’

तणाव वाढल्यानंतर दोन्ही नेत्यांची पहिली भेट

वास्तविक, जी-7 शिखर परिषद इटलीतील अपुलिया येथे आयोजित करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जस्टिन ट्रूडो यांच्यातील भेट हा चर्चेचा विषय ठरला आहे. कारण खलिस्तानी अतिरेक्यावरून राजनैतिक तणाव वाढल्यानंतर दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच भेट होती. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये दिल्लीत जी-20 परिषदेदरम्यान दोन्ही देशांच्या नेत्यांची शेवटची भेट झाली होती.

पंतप्रधान मोदी आणि जस्टिन ट्रूडो यांच्या भेटीनंतर कॅनडाच्या पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांवर थोडक्यात चर्चा केली. यावेळी ट्रुडो यांनी पंतप्रधान मोदींचे पुन्हा निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

Canada will work together with India Justin Trudeaus bill after meeting PM Modi

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात