राज ठाकरेंच्या वाढदिवशी औरंगजेब आणि मशिदीवरील भोंग्याच्या चित्राचा केक भेट!!

 

प्रतिनिधी

मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरेंना आज त्यांच्या वाढदिवसानिमित्तउत्साही कार्यकर्त्यांनी चक्क औरंगजेब अन् मशिदीवरील भोंग्याचा केक भेट दिला. राज ठाकरे यांनी यापूर्वी औरंगजेब आणि मशिदीवरील भोंग्यावरून आवाज उठवला होता. हेच ध्यानात घेत कार्यकर्त्यांनी ही उठाठेव केली. Cake gift of Aurangzeb and Bhonga on the mosque on Raj Thackeray’s birthday

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मध्यरात्रीपासून त्यांच्या कार्यकर्त्यांन शिवतीर्थावर गर्दी केली होती. शिवाय आज सकाळपासूनही शुभेच्छा देण्यासाठी रांगा लागल्या होत्या.

शुभेच्छांसाठी रांगा

राज ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी रात्रीपासूनच गर्दी केली होती. आज सकाळीही त्यांनी सपत्नीक हजेरी लावत कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. साडेआठ ते दुपारी बारा या वेळेत आपण शुभेच्छा स्वीकारू असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले होते. मात्र, काही उत्साही कार्यकर्त्यांनी रात्री बाराला शुभेच्छा देण्यासाठी हजेरी लावली. तेव्हा राज यांनी या कार्यकर्त्यांना झापले.

एका उत्साही कार्यकर्त्याने राज ठाकरे यांना औरंगजेब आणि मशिदीवरील भोंग्याचे चित्र आण त्यावर फुली मारलेला केक भेट दिला. राज यांनी यापूर्वी औरंगजेब आणि मशिदीवरील भोंग्यावरून अनेकदा उघड भूमिका घेतली आहे. यंदा राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आपल्या वाढदिवशी पुष्पगुच्छ, मिठाई अथवा कोणतीही भेटवस्तू आणू नका, असे आवाहन केले होते.

झाडांची रोपे, शैक्षणिक साहित्य

अगदीच काही आणावे वाटत असेल तर येताना झाडाचे रोप किंवा शैक्षणिक साहित्य आणावे. ही झाडांची रोपे विविध संस्थांना वृक्षारोपणासाठी देऊ आणि शैक्षणिक साहित्य गरजू विद्यार्थ्यांना आपल्या पक्षाकडून भेट म्हणून देऊ, असे आवाहन केले होते. मात्र, त्यांना किती कार्यकर्त्यांनी अशा भेटवस्तू दिल्या ते अजून समोर आले नाही.

Cake gift of Aurangzeb and Bhonga on the mosque on Raj Thackeray’s birthday

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात