केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया आणि अश्विनी वैष्णव यांनी बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. या दरम्यान अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. केंद्रीय मंत्रिमंडळाने IT हार्डवेअर क्षेत्रासाठी 17,000 कोटी रुपयांच्या उत्पादन-संबंधित प्रोत्साहन योजनेला मंजुरी दिली.याशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळाने खरीप हंगामासाठी 1.08 लाख कोटी रुपयांच्या खत अनुदानासही मान्यता दिली. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया आणि अश्विनी वैष्णव यांनी बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. Cabinet Decision Union Cabinet meeting approves incentive scheme for IT, hardware sector Green light for fertilizer subsidy
केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रात यावर्षी देशात १०० अब्ज डॉलरचे उत्पादन झाले आहे. यासह, गेल्या वर्षी 11 अब्ज डॉलर मोबाइलची विक्रमी निर्यात झाली. ‘पीएलआय फॉर आयटी हार्डवेअर’ला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. दूरसंचार उत्पादन क्षेत्रात 42 कंपन्यांनी पहिल्या वर्षी 900 कोटी रुपयांऐवजी 1600 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया म्हणाले की, देशात 325 ते 350 लाख मेट्रिक टन युरियाचा वापर होतो. 100 ते 125 लाख मेट्रिक टन डीएपी आणि एनपीके वापरले जातात. 50-60 लाख मेट्रिक टन एमओपी वापरला जातो. शेतकऱ्यांना वेळेवर खते मिळावीत म्हणून मोदी सरकारने सबसिडी वाढवली, पण एमआरपी वाढली नाही. खरीप पिकांसाठी केंद्र सरकार खतांच्या किमतीत वाढ करणार नाही, असा निर्णय सरकारने घेतला आहे. भारत सरकार खरीप हंगामातील पिकांसाठी अनुदान म्हणून 1 लाख 8 हजार कोटी रुपये खर्च करणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App