2030 पर्यंत भारतात 2 कोटी इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर धावणार; केंद्र सरकारचे नियोजन तयार

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशभरातल्या रस्ते वाहतुकीत नेमका कोणता महत्त्वपूर्ण बदल होणार आहे यावर केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठे भाष्य केले आहे. या दशकाच्या अखेरीस भारतीय रस्त्यांवर 2 कोटी इलेक्ट्रिक वाहने धावतील, अशी माहिती त्यांनी दिली आहे. By 2030, India will run 2 crore electric vehicles on the road.

इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि भविष्यातील गतिशीलता या विषयावरील एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, ई – मोबिलीटीमध्ये मोठी क्षमता आहे आणि गुंतवणूकदारांनी पर्यावरण वाचण्यासाठी या क्षेत्रात येऊन गुंतवणूक केली पाहिजे. 2030 पर्यंत भारतात सुमारे 2 कोटी इलेक्ट्रिक वाहने धावतील. तसे नियोजन केंद्र सरकारने केले आहे, असेही गडकरी म्हणाले.


देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी


इलेक्ट्रिक वाहनांमुळे केवळ प्रदूषण कमी होण्यास मदत होणार नाही तर रोजगार निर्मितीलाही मदत होईल, ज्याचा परिणाम देशाच्या विकासावर होईल आणि भारत स्वावलंबी होण्यास मदत होईल, या मुद्द्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

By 2030, India will run 2 crore electric vehicles on the road.

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात