काँग्रेसच्या शहजाद्याने अंबानी + अदानींकडून किती माल घेतला??, निवडणुकीत त्यांना शिव्या देणे बंद का केले??; मोदींचा बोचरा सवाल

विशेष प्रतिनिधी

हैदराबाद : काँग्रेसवर आणि विशेषतः राहुल गांधींवर आपल्या हल्ल्याचा पुढचा टप्पा सुरू करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमके नसेवर बोट ठेवत काँग्रेसच्या शहजादाने अंबानी + अदानींकडून नेमका किती माल घेतला आणि निवडणुकीत त्यांना अचानक शिव्या देणे का बंद केले??, असा बोचरा सवाल केला. But since the elections are declared, they have stopped abusing Ambani, Adani…

गेल्या 5 वर्षांमध्ये राहुल गांधींनी सातत्याने पंतप्रधान मोदींना टार्गेट करताना मोदी आपल्या उद्योगपती मित्रांसाठी काम करतात. देशातली 70 % संपत्ती मोदींच्या 22 मित्रांमध्ये वाटली गेली आहे. मोदी सामान्य जनतेचे खिसे कापतात आणि अदानी आणि अंबानी यांचे खिसे भरतात, असे आरोप केले. पंतप्रधान मोदींनी आज पहिल्यांदाच थेट उद्योगपतींची नावे घेऊन राहुल गांधींना बोचरे सवाल केले.

तेलंगणा मधल्या प्रचार सभेत काँग्रेस आणि राहुल गांधींवर प्रखर हल्लाबोल करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, राफेल घोटाळ्याचे आरोप जसे फेल गेले तसे गेल्या 5 वर्षांमध्ये राहुल गांधी रोज सकाळी जप केल्यासारखे 5 उद्योगपती – 5 उद्योगपती असे म्हणत होते. त्यानंतर त्यांनी अंबानी + अदानींची नावे घ्यायला सुरुवात केली. त्यांच्या नावाने आरडाओरडा सुरू केला, पण असा कोणता चमत्कार झाला की निवडणूक जाहीर होताच त्यांनी अंबानी + अदानींची नावे घेणे बंद केले??, त्यांच्या नावाने शिव्या देणे बंद केले?? काँग्रेसच्या शहजाद्याने अंबानी + अदानींकडून किती माल घेतला?? त्यांच्याकडून घेऊन किती काळा पैसा आपल्या तिजोरीत भरला??, पोती भरभरून नोटा कुठे पोहोचल्या??, नोटांनी भरलेले ट्रक कुठे अनलोड झाले??, या प्रश्नांची उत्तरे शहजाद्याला द्यावीच लागतील. तेलंगणाच्या भूमीवरून मी शहजादाला या प्रश्नांची उत्तरे देण्याचे आव्हान देतो!!

But since the elections are declared, they have stopped abusing Ambani, Adani…

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub