शिंदे – फडणवीस अयोध्येत राम दर्शन घेताना संजय राऊतांना आठवला शिवसैनिकांनी बाबरी पाडल्याचा अभिमान!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अयोध्या दौऱ्यामध्ये राम दर्शन घेतानाचा “मुहूर्त” संजय राऊत यांनी साधला आहे. शिंदे कॉलनी अयोध्येच्या रामाचे दर्शन घेत असताना संजय राऊत यांना बाबरी पाडल्याचा अभिमान आठवला आहे!! बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडली तेव्हा भाजपवाले पळून गेले होते, असा दावा त्यांनी नियमित पत्रकार परिषदेत केला आहे. But BJP never came with our party. When Babri incident happened they ran away

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री गिरीश महाजन माजी मंत्री राम शिंदे यांच्यासह शिवसेनेचे मंत्री आणि आमदार अशा सुमारे 50 नेत्यांनी हजारो शिवसैनिकांसह अयोध्येत राम लल्लांचे दर्शन घेतले. अयोध्येतील मंदिर बांधकामाची पाहणी केली. शिंदे -‘फडणवीसांचा हा कार्यक्रम सुरू असतानाच राजधानी नवी दिल्लीत संजय राऊत यांनी नियमित पत्रकार परिषदेत घेत या दोन्ही नेत्यांवर तोफ डागली.

महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडला आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री धार्मिक पर्यटनात मग्न आहेत, असा आरोप राऊत यांनी केला. मात्र त्याचवेळी त्यांनी धर्माच्या राजकारणात राजकारणाच्या विरोधात आपण नाही. आम्हीही अनेकदा आयोध्येला गेलो होतो. अयोध्येच्या आंदोलनात होतो. पण बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडली तेव्हा भाजपवाले आमच्यापासून पळून गेले होते, असा दावा राऊत यांनी केला आहे.

पण हा दावा करण्याचा “मुहूर्त” देखील राऊत यांनी शिंदे – फडणवीस यांच्या रामदर्शनाचा साधला आहे. गद्दारांच्या टोळीला रामाचा आशीर्वाद मिळणार नाही. मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्री आयोध्या दौऱ्यावरून परत महाराष्ट्रात येऊ द्यात. महाराष्ट्रात त्यांचे सरकार टिकणार नाही, असा दावाही राऊत यांनी केला आहे.

But BJP never came with our party. When Babri incident happened they ran away

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात