विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली:बुल्लीबाई (Bulli Bai ) या अॅपच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून मुस्लिम महिलांना लक्ष्य करून बदनाम करण्यात येत असून याबाबत एका पीडित महिला पत्रकाराने दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार केली यावर केंद्र सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे.BULLI BAI BLOCKED: Central government’s IT ministry takes serious action against Bullibai! Immediate action taken against app selling photos of Muslim women
माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्टीकरण देत महत्त्वाची माहिती दिली आहे. संबंधित युजरला ब्लॉक करण्यात आल्याचे गिटहबकडून सांगण्यात आले आहे. याबाबत कंप्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम आणि पोलीस अधिक चौकशी करत आहेत, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे
GitHub confirmed blocking the user this morning itself. CERT and Police authorities are coordinating further action. https://t.co/6yLIZTO5Ce — Ashwini Vaishnaw (मोदी का परिवार) (@AshwiniVaishnaw) January 1, 2022
GitHub confirmed blocking the user this morning itself. CERT and Police authorities are coordinating further action. https://t.co/6yLIZTO5Ce
— Ashwini Vaishnaw (मोदी का परिवार) (@AshwiniVaishnaw) January 1, 2022
सुल्लीडील अॅप काही महिन्यांपूर्वी चर्चेत आले होते. आता तशाच प्रकारे बुल्लीबाई अॅप आणले गेले आहे. गिटहब या प्लॅटफॉर्मवर हे अॅप लॉन्च करण्यात आले असून या अॅपच्या माध्यमातून मुस्लिम महिलांची कशाप्रकारे बदनामी केली जात आहे, याचं धक्कादायक वास्तवच एका महिला पत्रकाराने समोर आणलं आहे.
या पत्रकाराने ट्वीटरच्या माध्यमातून स्वत:ला आलेला अनुभव कथन केला आहे. त्याचवेळी या पत्रकाराने दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलकडे याबाबत ऑनलाइन तक्रार केली आहे. ‘बुल्लीबाई अॅपवर माझा एक मॉर्फ केलेला फोटो पोस्ट करण्यात आला असून माझी बदनामी केली जात आहे.
याची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी महिला पत्रकाराने तक्रारीत केली आहे. त्याची दखल घेत पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी सुरू केली आहे.
बुल्लीबाई अॅप उघडल्यानंतर रँडमली मुस्लिम महिलांचे फोटो दिसत राहतात. युजर त्यातील एखादा फोटो ‘बुल्ली बाई ऑफ द डे’ म्हणून सीलेक्ट करतो. त्यानंतर त्यावर अश्लील आणि आक्षेपार्ह कमेंट केल्या जातात आणि त्या फोटोवर बोली लावली जाते.
मग हा फोटो BulliBai या हॅशटॅगने दिवसभर ट्रेंड केला जातो. सध्या ट्वीटर आणि फेसबुकवर अधिक सक्रिय असलेल्या किमान १०० महिलांना या अॅपवरून लक्ष्य करण्यात येत आहे. मीडियासह इतर क्षेत्रातील महिलांचाही त्यात समावेश आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App