आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या घरावर चालला बुलडोझर

जाणून घ्या, नेमकं काय कारण होतं? bulldozer ran over the house of former Chief Minister of Andhra Pradesh Jagan Mohan Reddy

विशेष प्रतिनिधी

हैदराबाद : महानगरपालिकेने शनिवारी आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या लोटस पॉन्ड निवासस्थानाशेजारील फूटपाथवरील बेकायदा बांधकाम पाडले. रेड्डी यांनी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर 10 दिवसांनी ही कारवाई करण्यात आली आहे.

जीएचएमसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जगन यांच्या घरासमोरील फूटपाथवरील कंपाउंड वॉलला लागून असलेले बेकायदा बांधकाम पाडले.

या बेकायदा बांधकामांचा वापर सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून होत असल्याचे त्यांनी सांगितले. जीएचएमसीच्या नगर नियोजन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, बेकायदेशीर बांधकाम हटवण्यासाठी त्यांनी जगनच्या निवासस्थानी संबंधितांना फूटपाथच्या बांधकामासाठी सहा महिने अगोदर कळवले होते.

अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, ‘आम्ही त्यांना फूटपाथच्या बांधकामासाठी बेकायदेशीर बांधकाम हटवण्यास सांगितले आहे. फुटपाथवर अतिक्रमण झाल्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्यांची गैरसोय होत असल्याच्या तक्रारी वसाहतीतील रहिवाशांनी केल्या आहेत.

वायएसआर काँग्रेस पक्षाच्या सूत्रांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ही बांधकामे पाऊस आणि उन्हाळ्यात सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी करण्यात आली आहेत.

bulldozer ran over the house of former Chief Minister of Andhra Pradesh Jagan Mohan Reddy

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात