वृत्तसंस्था
श्रीनगर : उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, जम्मु , गुजरात आदी राज्यांमध्ये गुंड माफिया दंगेखोर यांच्या अवैध मालमत्तांवर चालवलेला बुलडोझर बऱ्याच नेत्यांना खूपतो आहे. त्यातून आता “नवे राजकीय कांगावासूर” उमटू लागले असून जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुक्ती आणि ओमर अब्दुल्ला या दोन नेत्यांची त्यामध्ये भर पडली आहे. या दोन्ही नेत्यांनी त्याला बुलडोजर च्या कायदेशीर कारवाईला धार्मिक रंग दिला असून मोदी – योगींच्या बुलडोजर कारवाई मुळे लाखो मुसलमान घाबरले आहेत. ते भीतीच्या छायेखाली जगत आहेत, असा आरोप केला आहे.Bulldozer Baba: Millions of Muslims terrified of bulldozers; Mehbooba Mufti’s “Kangawa Surat” Omar Abdullah’s tune
श्रीनगर मध्ये पत्रकारांशी बोलताना मेहबूबा मुफ्ती यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार शरसंधान साधले. काश्मीर मधून 370 कलम हटवून पंतप्रधान मोदींनी काहीही साध्य केले नाही. उलट काश्मीरी मुसलमान युवकाचा रोजगार काढून घेतला. लाखो कुटुंबांना रोजीरोटीसाठी मोताद केले. काश्मीरची आर्थिक हालत खास्ता केली आणि आता मुसलमानांच्या घरांवर बुलडोझर चालवून ते देशाचे सामाजिक संवाद बिघडवत आहेत, असा आरोप मेहबूबा मुफ्ती यांनी केला.
मेहबूबा मुफ्ती यांच्या सुरात आज माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी आपला सूर मिसळला. मुसलमानांच्या घरांवर बुलडोझर चालवले जात आहेत आणि प्रसार माध्यमे आता बुलडोजर कमी पडतील. बुलडोजरची आयात करावी लागेल, अशा बातम्या छापत आहेत. ज्या प्रसार माध्यमांनी तटस्थ राहून सरकारचे वाभाडे काढले पाहिजेत, तीच माध्यमे सरकारच्या कट कारस्थानात सामील झाली आहेत. मुसलमानांच्या घरावर बुलडोझर चालल्यानंतर मुसलमानांच्या मनाला काय वाटत असेल??, याचा विचार त्यांनी केला आहे का??, असा सवाल ओमर अब्दुल्ला यांनी केला आहे.
जम्मूमध्ये अवैध बांधकामांवर बुलडोझर
जम्मूमध्ये शेकडो एकर जमीन गुपकार नेत्यांच्या निकटवर्तीयांनी हडप केल्या आहेत. त्या गेल्या 6 महिन्यांपासून सोडविण्याचे काम सुरू आहे. काही ठिकाणी जम्मू प्रशासनाने कायदेशीर परवानगी घेऊन अवैध बांधकामांवर बुलडोझर चालवले आहेत. त्यानंतर आता मेहबूबा मुफ्ती आणि उमर अब्दुल्ला या दोन माजी मुख्यमंत्र्यांनी बुलडोजर कारवाई विरुद्ध आवाज काढल्याचे दिसून येत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App