विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जेनेटिकली मॉडीफाय BT cotton कॉटनला काँग्रेस प्रणित यूपीए सरकारने प्रोत्साहन दिले. त्या सरकारचे कृषिमंत्री शरद पवारांनी BT cotton मुळे कापसाचे उत्पादन आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढले, याविषयी त्यावेळी जोरदार समर्थन करणारी भाषणे केली होती. पण आता विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मात्र BT cotton विरोधात आवाज उठवला.
राहुल गांधींनी राजधानी नवी दिल्लीमध्ये एका मोठ्या दुकानांमध्ये जाऊन भारताची टेक्स्टाईल इंडस्ट्री समजून घेतली. त्या दुकानाच्या मालकांशी चर्चा केली. कापूस उत्पादनापासून ते प्रत्यक्ष कापड उत्पादनापर्यंत आणि डिझायनर पासून ते ग्राहकापर्यंत कापसाचा प्रवास कसा होतो?, हे एच. पी. सिंग टेक्स्टाईलच्या मालकांनी त्यांना समजावून सांगितले. भारतात प्रत्येक शंभर किलोमीटर नंतर कापूस त्याचा पोत, रंग, धाग्याचा प्रकार, कापडाचा प्रकार बदलतो. भारत जगातला सर्वोत्तम कापूस उत्पादित करतो. यासंबंधीची माहिती एच. पी. सिंग टेक्सटाईलच्या मालकांनी राहुल गांधींना दिली.
मात्र त्यांनी बी टी कॉटन विरोधात आवाज उठवला. बीटी कॉटनच्या उत्पादनामुळे भारतीय कापसाच्या प्रजाती मागे पडल्या. बी टी कॉटनचा सगळा पैसा परदेशात गेला. अमेरिकेत कोट्यावधी डॉलर्स गेले. चीनने कापड उत्पादनात आणि निर्यातीत भारताला मागे टाकले, एच. पी. सिंग टेक्स्टाईलच्या मालकांनी राहुल गांधी यांच्याकडे केली. त्यामुळे सरकारने या संदर्भात नेमके काय केले पाहिजे??, तुमची काय सूचना आहे??, अशी विचारणार राहुल गांधींनी त्यांना केली.
पण अशी विचारणा करणार राहुल गांधी ही विसरले की BT cotton उत्पादनाला काँग्रेस प्रणित यूपीए सरकारनेच प्रोत्साहन दिले होते. त्या सरकारचे कृषिमंत्री शरद पवार यांनी भेटी कॉटन उत्पादनातून शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि उत्पादन किती वाढते याची वर्णने करणारी भाषणे केली होती. अनेक शेतकरी संघटनांनी बी टी कॉटन विरोधात आवाज उठवल्यानंतर तो आवाज यूपीए सरकारनेच दडपला होता. पण दिल्लीतल्या मोठ्या दुकानात जाऊन भारताचे टेक्स्टाईल इंडस्ट्री समजून घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी बी टी कॉटन विरोधात आवाज उठवला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App