BSF चे वाढीव कार्यक्षेत्र; अटकाव कुणाला…??, पोटदुखी कुणाला…??, सरकारने संसदेत दिले उत्तर!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : सीमा सुरक्षा दल अर्थात BSF बीएसएफचे कार्यक्षेत्र केंद्र सरकारने पश्चिम बंगाल, आसाम आणि पंजाब या राज्यांमध्ये वाढवले आहे. सीमेपासून १५ किलोमीटर अंतरापर्यंत पूर्वी बीएसएफचे कार्यक्षेत्र होते, ते आता ५० किलोमीटर पर्यंत वाढविले आहे. परंतु पंजाब मधल्या काँग्रेस आणि पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस यांच्या सरकारांनी त्याला विरोध केला आहे. BSF jurisdiction extended to curb smuggling of arms, drugs and cattle, says government in Parliament

मात्र बीएसएफचे कार्यक्षेत्र नेमके का वाढविले?, याचे उत्तर आज गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत दिले आहे. सीमेपलीकडून ड्रोन सारख्या नव्या तंत्रज्ञानाने शस्त्रास्त्रे, ड्रग्ज इकडील स्मगलर्सना पुरवण्यात येतात. इथले स्मगलर्स मग बीएसएफच्या कार्यक्षेत्राच्या पलिकडे जाऊन बंगाल, पंजाब आणि आसाम यांच्या अंतर्गत प्रदेशांमध्ये आश्रय घेतात. त्या प्रदेशातून शस्त्रास्त्रे, ड्रग्ज नक्षलग्रस्त भागात पुरविण्यात येतात. या स्मगलर्सना अटकाव करण्यासाठी तसेच ड्रोन सारख्या तंत्राला परिणामकारक प्रतिबंध करण्यासाठी बीएसएफ टचे कार्यक्षेत्र वाढविले आहे, असे नित्यानंद राय यांनी स्पष्ट केले आहे.


BSF अधिकारक्षेत्रात वाढीच्या आदेशाविरोधात पंजाब सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव, विधानसभेत ठरावही येण्याची शक्यता


त्याच वेळी एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्याकडे त्यांनी सदनाचे लक्ष वेधले आहे. आसाम आणि बंगाल यांच्यासारख्या प्रदेशातून बांगलादेशात मोठ्या प्रमाणावर गोवंशाचे स्मगलिंग होते. या स्मगलिंग संदर्भात आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्वकर्मा यांनी मध्यंतरी आकडेवारी जाहीर केली होती. दर वर्षी सुमारे ११ हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार यात होतो. या गोवंशाच्या स्मगलिंगला अटकाव करण्यासाठी बीएसएफच्या कार्यक्षेत्रात वाढ करण्याची गरज आधीचा तज्ञ समितीने व्यक्त केली होती. तिची अंमलबजावणी आसाम आणि बंगाल मध्ये करण्यात आली आहे. गोवंशाचे
स्मगलर्स देखील बंगालमध्ये अशाच प्रकारे अंतर्गत भागात म्हणजे बीएसएफच्या कार्यक्षेत्र बाहेर जाऊन आश्रय घेतात आणि आपल्या बेकायदेशीर कारवाया चालू ठेवतात. या स्मगलर्सना राज्यांमध्ये राजकीय आश्रय मिळतो. हे लक्षात आल्यानेच तेथे बीएसएफचे कार्यक्षेत्र 15 किलोमीटर पासून ५० किलोमीटर पर्यंत वाढविण्यात आले आहे, असे नित्यानंद राय यांनी स्पष्ट केले आहे.

मात्र, पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकार आणि पंजाब मधील काँग्रेस सरकार यांनी बीएसएफ असे कार्यक्षेत्र वाढविण्याला विरोध केला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि चरणजीत सिंग चन्नी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन बीएसएफचे कार्यक्षेत्र पूर्ववत म्हणजे १५ किलोमीटर्स अंतर्गत ठेवावे, अशी मागणी केली आहे. या मागणी तले “बिटवीन द लाईन्स” लक्षात घेतले की बीएसएफचे कार्यक्षेत्र कोणाला अटकाव करण्यासाठी वाढविण्यात आले आहे आणि पोटदुखी नेमकी कोणाची वाढली आहे, हे लक्षात येते…!!

BSF jurisdiction extended to curb smuggling of arms, drugs and cattle, says government in Parliament

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात