इस्रायल हिजबुल्लाहवर सातत्याने हल्ले करत असून लेबनॉनच्या सीमेवर रणगाडे तैनात केले गेले आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : गेल्या शुक्रवारी (27 सप्टेंबर) इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारला गेलेला हिजबुल्ला प्रमुख हसन नसरुल्लाह ( Nasrullah ) याचा मृतदेह सापडला आहे. सुरक्षा आणि वैद्यकीय पथकाने घटनास्थळावरूनच मृतदेह बाहेर काढला आहे. त्याचवेळी इस्रायल हिजबुल्लाहवर सातत्याने हल्ले करत असून रविवारी (29 सप्टेंबर) लेबनॉनच्या सीमेवर रणगाडे तैनात केले आहेत.
वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, हिजबुल्लाह नेत्याचा मृतदेह ‘सुरक्षित’ सापडला आहे. दोन सूत्रांनी रॉयटर्सला सांगितले की हिजबुल्लाचा नेता हसन नसरुल्लाह याचा मृतदेह सापडला आहे. वैद्यकीय स्त्रोत आणि सुरक्षा स्त्रोताने सांगितले की, बेरूतच्या दक्षिणी उपनगरात इस्रायली हवाई हल्ल्याच्या ठिकाणी त्याचा मृतदेह अखंड सापडला आहे.
त्याच्या शरीरावर कोणत्याही थेट जखमा नसून मोठा स्फोट झाल्याने मृत्यू झाल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. दुसरीकडे, इस्रायलने सांगितले की, हिजबुल्लाच्या लक्ष्यांवर हल्ले सुरूच आहेत. एका नवीन अपडेटमध्ये, इस्रायली सैन्याने सांगितले की त्यांनी गेल्या काही तासांत लेबनॉनमधील अनेक हिजबुल्लाह लक्ष्यांवर हल्ला केला आहे. हिजबुल्लाहचे रॉकेट लाँचर आणि शस्त्रास्त्रांची गोदामे उद्ध्वस्त करणे हा या हल्ल्यांचा उद्देश असल्याचे लष्कराचे म्हणणे आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App