तामिळनाडूत फटाक्यांच्या दोन कारखान्यांमध्ये स्फोट, 11 जणांचा मृत्यू; मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 3 लाखांची मदत

वृत्तसंस्था

चेन्नई : मंगळवारी, 17 ऑक्टोबर रोजी तामिळनाडूतील दोन फटाक्यांच्या कारखान्यांना लागलेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले. रंगपालयम आणि किचेनायकनपट्टी गावात हा अपघात झाला. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 3 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. जखमींना प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे.Blasts at two firecracker factories in Tamil Nadu, 11 dead; 3 lakh each to the families of the deceased



रंगपालयमच्या फटाका कारखान्यात स्फोट झाल्यानंतर ही आग लागल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस, अग्निशमन दल आणि बचाव कर्मचार्‍यांनी आसपासच्या लोकांसह आग विझविली. येथे ढिगाऱ्यातून 7 जळालेले मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही. हे लोक येथे काम करणारे मजूर असू शकतात. या अपघातात तीन जण भाजले. नंतर तिघांचाही मृत्यू झाला.

दुसरी दुर्घटना किचनायकनपट्टी गावातील फटाक्यांच्या कारखान्यात घडली. येथे एकाचा मृत्यू झाला. येथे दोन महिला मजुरांचा जीव वाचला. त्यांना उपचारासाठी श्रीविल्लीपुत्तूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Blasts at two firecracker factories in Tamil Nadu, 11 dead; 3 lakh each to the families of the deceased

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात