विरोधी पक्षांची महाआघाडी २०२४ मध्ये ३०० पेक्षा जास्त जागा जिंकणार असल्याचा दावा करणाऱ्या लालूंना भाजपाचे प्रत्युत्तर!


माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पलटवार केला, म्हणाले…

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशातील विरोधी पक्ष 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाविरोधात संयुक्त विरोधी महाआघाडी करण्याचा विचार करत आहेत. तर ही आघाडी 300 हून अधिक जागा जिंकेल, असा दावा आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी केला. यावर बिहारमधील भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांनी प्रतिक्रिया देत भाजपा बिहारमध्ये सर्व 40 जागा जिंकेल असे सांगितले आहे. BJPs reply to Lalu Prasad Yadav who claimed to win more than 300 seats in 2024

लालूप्रसाद यादव यांच्या वक्तव्यावर बोलताना रविशंकर प्रसाद म्हणाले, लालूजी काही नवीन बोलले नाही. पण 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी जी मिरवणूक सजली आहे, त्याचा नवरदेव कोण आहे? तसेच, लालू यादव यांना टोमणा मारताना रविशंकर प्रसाद म्हणाले की, काळजी करू नका, आम्ही बिहारमधील सर्व 40 जागा जिंकू. पण तुम्हाला अजून खूप काही करायचे आहे. चारा घोटाळ्यात केलेल्या नवीन आरोपपत्रावर उत्तर द्यायचे आहे, नोकरीच्या बदल्यात जमिनीच्या प्रकरणात उत्तर द्यायचे आहे, तुम्हाला अजून बरीच उत्तरे द्यायची आहेत.

प्रसारमाध्यमांशी बोलताना लालू प्रसाद यादव यांनी गुरुवारी (६ जुलै) सांगितले होते की,’ महाआघाडीसाठी (२०२४ च्या निवडणुकीत) किमान ३०० जागा येतील. पंतप्रधान हे भ्रष्टाचाऱ्यांचे संचालक आहेत. ज्यांना ते भ्रष्ट म्हणायचे, त्यांनाच महाराष्ट्रात मंत्री केले, हे आता सर्वांनी पाहिले आहे.’’

BJPs reply to Lalu Prasad Yadav who claimed to win more than 300 seats in 2024

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात