दक्षिणेत भाजपची बेरजेचे राजकारण; अनिल अँटनींपाठोपाठ पाठोपाठ आंध्रचे माजी मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी भाजपमध्ये!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : दक्षिणेत 144 लोकसभा मतदारसंघांवर भाजपने राजकीय कॉन्सन्ट्रेशन केल्याचे सांगितले जात असतानाच त्या केवळ वरवरच्या परसेप्शनच्या बातम्या नाहीत, तर त्या पलिकडे प्रत्यक्ष राजकीय कृती भाजप करीत आहे, हेच गेल्या दोन दिवसांपासून दिसून येत आहे. भाजपने दक्षिणेतील राज्यातील दोन दिग्गज नेते आपल्या गळाला लावले आहेत. भाजपने दक्षिणेतले बेरजेचे राजकारण करून मतांच्या गुणाकाराचे गणित जमविण्याचा प्रयत्न केला आहे. BJP’S plus politics, after anil antony former chief minister of andhra Pradesh kiran Kumar reddy joined BJP

अनिल अँटनींचा भाजपला लाभ 

काँग्रेसचे “कॉन्शियस कीपर” आणि माझी संरक्षण मंत्री ए के अँटनी यांचे चिरंजीव अनिल अँटनी हे परवाच भाजपमध्ये दाखल झाले. त्याचा राजकीय फायदा भाजपला केरळमध्ये होणे अपेक्षित आहे. राहुल गांधींनी खासदारकी गमावल्यानंतर वायनाड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होवो अथवा न होवो, अनिल अँटनींचा भाजपला अपेक्षित असणारा लाभ त्या पलिकडच्या आणि दीर्घकालीन आहे. ए. के. अँटनी यांची काँग्रेसमध्ये जी राजकीय विश्वासार्हता होती, तीच राजकीय विश्वासार्हता घेऊन अनिल जर भाजपमध्ये आले असतील, तर त्याचा लाभ निश्चितच भाजपला होणे अपेक्षित आहे.

किरण कुमार रेड्डींचा भाजप प्रवेश

जे केरळमध्ये भाजपने घडविले आहे, तेच आंध्र प्रदेशात रिपीट केले आहे. अखंड आंध्र प्रदेशचे मुख्य शेवटचे मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसमध्ये आत्मचिंतन होतच नाही. काँग्रेस जनतेच्या अशा अपेक्षांपासून दूर गेली आहे आणि त्यामुळेच तो पक्ष सोडून मी जनतेशी संलग्न राहू शकणाऱ्या भाजपच्या गोटात आलो आहे, असे किरण कुमार रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे.

दक्षिणेतला मोठा चेहरा

दक्षिणेत भाजपकडे नावाजलेला स्वतःचा चेहरा नाही. किरण कुमार रेड्डी हे भाजपसाठी दक्षिणेतला एक मोठा चेहरा ठरू शकतात. किंबहुना जिथे भाजपला गमावण्यासारखे काहीच नाही, तिथे भाजपच्या बेरजेच्या राजकारणात किरण कुमार रेड्डी यांच्यासारखा ज्येष्ठ नेता निश्चितच उपयोगी ठरू शकेल.

बेरजेचे राजकारण, मतांचा गुणाकार

अखंड आंध्र प्रदेशाचे ते शेवटचे मुख्यमंत्री होते. वाय. एस. राजशेखर रेड्डी या लोकप्रिय मुख्यमंत्र्याच्या निधनानंतर काँग्रेसने त्यांचे चिरंजीव वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांना टाळून किरण कुमार रेड्डी यांना मुख्यमंत्री केले होते. पण नंतर किरण कुमार रेड्डी आणि काँग्रेसचे हायकमांड यांच्यातच वाजले आणि ते आंध्रच्या राजकारणात अलग थलग पडले. वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी काँग्रेस हायकमांडशी सतत संघर्ष करून स्वतःच्या हिंमतीवर आंध्र प्रदेशात सत्ता आणून दाखविली, त्यानंतर तर किरण कुमार रेड्डी हे पूर्णपणे राजकारणातून बाजूला गेल्यात जमा होते. पण आता भाजपचा झेंडा हातात घेतल्यानंतर ते त्यांचा पॉलिटिकल रेलेव्हन्स सिद्ध करून भाजपच्या पारड्यात सबस्टेशन मते टाकू शकतील अशी स्थिती आहे दक्षिणेत भाजपने बेरजेचे राजकारण करून मतांच्या गुणाकाराचे गणित जमवण्याचा प्रयत्न चालविला आहे.

BJP’S plus politics, after anil antony former chief minister of andhra Pradesh kiran Kumar reddy joined BJP

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात