उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत दिग्विजयासाठी भारतीय जनता पक्षाने मास्टर प्लॅन आखला आहे. 100 दिवसांत 100 कार्यक्रम करण्याची तयारी करत आहे. मतदारांशी संवाद साधण्यासाठी पक्षाच्या 100 दिवसांच्या या कार्यक्रमासंदर्भात चर्चेच्या शेवटच्या फेरीसाठी दिल्ली येथे एक बैठकही बोलावण्यात आली आहे. BJP’s master plan for Uttar Pradesh Digvijaya, 100 programs in 100 days
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत दिग्विजयासाठी भारतीय जनता पक्षाने मास्टर प्लॅन आखला आहे. 100 दिवसांत 100 कार्यक्रम करण्याची तयारी करत आहे. मतदारांशी संवाद साधण्यासाठी पक्षाच्या 100 दिवसांच्या या कार्यक्रमासंदर्भात चर्चेच्या शेवटच्या फेरीसाठी दिल्ली येथे एक बैठकही बोलावण्यात आली आहे. BJP’s master plan for Uttar Pradesh Digvijaya, 100 programs in 100 days
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीला आता पाच महिन्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. भारतीय जनता पक्ष पुन्हा विजयाची पुनरावृत्ती करण्यासाठी कंबर कसून कामाला लागला आहे.
प्रभारी राधा मोहन सिंग, यूपी भाजपचे प्रमुख स्वतंत्र देव सिंह हे रणनीतीवर चर्चा करण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बीएल संतोष यांची दिल्लीत भेट घेत आहेत. भाजप सरकारने सुरू केलेल्या कल्याणकारी योजनांसह मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर योजना तयार केली जात आहे.
प्रत्येक आघाडीला विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यक्रम आणि बैठका पूर्ण करण्यासाठी ठराविक दिवस दिले जातील. प्रत्येक आघाडीला प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पोहोचायचे आहे. या यादीत मंडलनिहाय पन्ना प्रमुख संमेलन, सहा भागांत सदस्यत्व अभियान, कमल दिवाळी, प्रत्येक बूथमध्ये 100 सदस्य सामील करणे, तसेच ज्या 81 जागांवर गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला होता, त्या ठिकाणी रॅलींचा समावेश आहे. दिल्लीत बोलावण्यात आलेल्या या बैठकीत प्रत्येक मतदारांपर्यंत आपल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना कसे पोहोचवायचे यासह, विरोधी पक्षांकडून होत असलेल्या हिंदू मतांच्या धृवीकरणासंदर्भातही चर्चा होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App