वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Ramesh Bidhudi भाजपने ७० सदस्यीय दिल्ली विधानसभेसाठी २९ उमेदवारांची पहिली यादी शनिवारी जाहीर केली. यात नवी दिल्ली मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री व आपचे संयोजक अरविंद केजरीवालांविरुद्ध माजी खासदार प्रवेश वर्मांना तिकीट दिले. तर कालका जागेसाठी भाजपने माजी खासदार रमेश बिधुडींना उमेदवारी दिली. मुख्यमंत्री आतिशी येथे आपच्या उमेदवार आहेत. काँग्रेसने नवी दिल्ली जागेसाठी माजी खासदार संदीप दीक्षित व कालकासाठी महिला काँग्रेस अध्यक्षा अलका लांबा यांना तिकीट दिले. आपने सर्व ७० जागी नावे जाहीर केली आहेत. भाजपने आपमधून आलेले कैलास गहलोत, राजकुमार आनंद, कर्तारसिंग व एन. डी. शर्मा तथा काँग्रेसमधून आलेले आशिष सिसोदिया, जगदीश यादव व संतोष गहलोत यांना उमेदवारी दिली.Ramesh Bidhudi
भाजप-काँग्रेसने युती जाहीर करावी
केजरीवाल म्हणाले, मी तुरुंगात गेल्यावर यांनी गैरप्रकार केले आणि लोकांचे पाण्याचे बिल हजारो रुपये यायला लागले. ज्यांची बिले चुकीची आहेत त्यांची निवडणुकीनंतर माफ करू. ते म्हणाले, भाजप-काँग्रेस दिशाभूल करत आहेत. त्यांनी युतीची घोषणा करावी.
४५ कोटी रुपयांच्या काचेच्या महालाबाबत उत्तर द्या : शाह
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, केजरीवाल मुख्यमंत्री असताना १० वर्षांत पायाभूत सुविधांऐवजी स्वत:साठी ‘काचेचा महाल’ बनवला. सरकारी कार किंवा बंगला घेणार नाही, अशी शपथ केजरीवाल यांनी घेतली होती. मात्र, ४५ कोटी खर्च करत ५०,००० चौरस फुटांचा ‘काचेचा महाल’ बनवला. चार लोकांच्या कुटुंबासाठी १५ कोटींचे पाणी संयंत्र लावले. डिझायनर मार्बलवर ६ कोटी, पडद्यांवर ६ कोटी, दरवाजांवर ७० लाख व स्मार्ट टीव्हीवर ६४ लाख रुपये खर्च केले. त्यांनी उत्तर द्यावे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App