विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशाच्या राजकीय रंगभूमीवर उत्तर आणि दक्षिणेत दोन वेगवेगळे खेळ सुरू आहेत. भाजपचे टॉप बॉसेस कर्नाटक निवडणुकीच्या रणमैदानात प्रत्यक्ष रस्त्यावर प्रचार करण्यात मग्न आहेत, तर विरोधकांचे बॉसेस राजधानी नवी दिल्लीतील कुस्तीगीर आंदोलनाला राजकीय चिथावणी देण्यात व्यस्त आहेत!! BJP top leaders in karnataka, opposition leaders triggering wrestling agitation
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आज आपले सगळे टॉप बॉसेस रणमैदानात उतरवले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बेंगलुरु सह विजयपुरा वगैरे भागात मोठ्या रॅली तर केल्याच, त्याच बरोबर बेंगलुरू मध्ये मोठा रोड शो ही केला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बसवनगुंडीमध्ये रॅली आणि रोड शो केला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा दावणगिरीत होते, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मेंगलुरूमध्ये रोड शो केला. या चारही बड्या नेत्यांच्या मोठमोठ्या रॅली किंवा रोड शो यांनी कर्नाटक आज गजबजला होता. यापैकी प्रत्येकाने पीएफआय विरुद्ध राष्ट्रवाद हाच मुद्दा लावून धरला.
त्याचवेळी विरोधकांचे दोन बॉसेस काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे राजधानी नवी दिल्लीत कुस्तीगीरांच्या आंदोलनाला राजकीय चिथावणी देण्यासाठी पोहोचले होते. कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष खासदार ब्रजभूषण सिंह यांच्या हाकालपट्टीसाठी प्रियांका गांधी आग्रही राहिल्या, तर अरविंद केजरीवालांनी त्यापुढे जाऊन कुस्तीगीर आंदोलन शेतकरी आंदोलनासारखे पेटावे यासाठी चिथावणी दिली.
कुस्तीगीर आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी देशातील नागरिकांनी सुट्टी घेऊन दिल्लीला यावे. त्यांची दिल्ली सरकारतर्फे व्यवस्था करतो, असा शब्द केजरीवालांनी देऊन त्या आंदोलनाला राजकीय चिथावणी दिली.
काशी – तेलुगु संगम
तिसरीकडे काशीमध्ये जसा काशी तमिल संगम झाला होता, त्याच धर्तीवर काशी – तेलुगू संगम देखील आज झाला. या संगम ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संबोधित केले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दक्षिणेतल्या 144 लोकसभा मतदारसंघांवर कॉन्सन्ट्रेशन केले आहे. काशी – तमिळ संगम आणि काशी – तेलुगु संगम हे दोन्ही संगम दक्षिण – उत्तरेच्या राजकारणाला सांस्कृतिक बंधाद्वारे जोडणार आहेत.
सांस्कृतिक बंधा द्वारे राजकारण
एकीकडे विरोधकांना शेतकरी काय किंवा कुस्तीगीर काय त्यांच्या आयत्या आंदोलनांमध्ये घुसून चिथावणी देण्यात रस आहे, तर दुसरीकडे काशी – तमिळ आणि काशी – तेलुगू संगमांद्वारे सांस्कृतिक बंध मजबूत करून त्याचा राजकीय लाभ मिळवण्याकडे भाजपचा कल दिसतो आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App