यशस्वी प्रत्यार्पण हे मोदी सरकारच्या दहशतवादाविरुद्धच्या कठोर धोरणाचा पुरावा आहे, असंही भाजपने म्हटलं आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वुर राणा याच्या प्रत्यार्पणाबाबत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले की, त्याला अमेरिकेतून भारतात आणणे ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणासाठी हा एक मोठा विजय असल्याचे त्यांनी वर्णन केले.
पूनावाला म्हणाले की, हे प्रत्यार्पण केवळ कायदेशीर प्रक्रिया नाही तर भारताच्या नवीन संकल्पाचे आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. ते म्हणाले, ‘गुन्हेगार कितीही खोलवर लपला असला तरी, भारताकडे आता त्याला शोधून न्याय करण्याची ताकद आहे.
यावेळी त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधताना म्हटले की, यूपीएच्या काळात दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाई करण्याऐवजी व्होट बँकेचे राजकारण केले गेले. त्यांनी आरोप केला की यूपीए सरकारच्या काळात काही दहशतवाद्यांना फक्त ते एका विशिष्ट धर्माचे असल्याने सोडण्यात आले. त्यावेळी पाकिस्तानला ‘मोस्ट फेवर्ड नेशन’चा दर्जा देण्यात आला होता, तर आज अशा देशाविरुद्ध ‘सडेतोड उत्तर’ चे धोरण अवलंबले जाते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App