पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड यांच्या दाव्यावर केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, काँग्रेसमध्ये हे नवीन नाही. नेहरू जी (काँग्रेस) अध्यक्ष झाले तेव्हा सर्वांनी पटेलजींना पाठिंबा दिला, त्यांना नाही. पटेलजींचा आदर केला जात नसेल तर जाखड यांच्याबाबत हे होईल याची अपेक्षा कशी करता येईल.BJP reaction to Sunil Jakhar claim Meenakshi Lekhi says- this is not new in Congress, incident connected with Sardar Patel
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड यांच्या दाव्यावर केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, काँग्रेसमध्ये हे नवीन नाही. नेहरू जी (काँग्रेस) अध्यक्ष झाले तेव्हा सर्वांनी पटेलजींना पाठिंबा दिला, त्यांना नाही. पटेलजींचा आदर केला जात नसेल तर जाखड यांच्याबाबत हे होईल याची अपेक्षा कशी करता येईल.
Correction: It's not* new. When Nehruji had become (Cong) chief, everyone supported Patel Ji, not him. If Patel Ji wasn't respected, how can you expect it for Jakhar Ji: Meenakshi Lekhi on Sunil Jakhar claiming to have support of 42 MLAs after Amarinder Singh quit as Punjab CM pic.twitter.com/pMfXhINLO5 — ANI (@ANI) February 2, 2022
Correction: It's not* new. When Nehruji had become (Cong) chief, everyone supported Patel Ji, not him. If Patel Ji wasn't respected, how can you expect it for Jakhar Ji: Meenakshi Lekhi on Sunil Jakhar claiming to have support of 42 MLAs after Amarinder Singh quit as Punjab CM pic.twitter.com/pMfXhINLO5
— ANI (@ANI) February 2, 2022
काय आहे प्रकरण?
काँग्रेस प्रचार समितीचे अध्यक्ष सुनील जाखड यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये जाखड दावा करत आहेत की, कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर 42 आमदारांनी माझ्या बाजूने मतदान केले. तर नवज्योतसिंग सिद्धू यांना सहा आमदारांचा, तर विद्यमान मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांना दोन आमदारांचा पाठिंबा मिळाला. उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा यांना 16 आमदारांनी, तर कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी परनीत कौर यांना 12 आमदारांचा पाठिंबा होता.
अचानक चन्नी यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळाली
राजकीय उलथापालथीच्या काळात अचानक चरणजीत सिंह चन्नी यांना पंजाबचे मुख्यमंत्री बनवण्यात आले. तर सुरुवातीला त्याचे नावही शर्यतीत नव्हते. सुनील जाखड यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना राहुल गांधींनी उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती. मात्र त्यांनी ते मान्य केले नाही. आता भाजप त्याला सुनील जाखड यांच्या अपमानाशी जोडून पाहत आहे. मीनाक्षी लेखी यांनी सडेतोड प्रत्युत्तर देत सुनील जाखड आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मदतीने काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App