चिराग पासवानांचा NDA मध्ये प्रवेश निश्चित? भाजपा अध्यक्ष नड्डा यांनी पत्र लिहून पाठवला ‘हा’ संदेश!

ljp mp being rebellion against lok janshakti party chief chirag paswan

चिराग पासवान यांचीही या पत्रावर प्रतिक्रिया समोर आली आहे, जाणून घ्या पत्रात  नेमकं  काय आहे?

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांनी चिराग पासवान यांना पत्र लिहून एनडीएच्या बैठकीत उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. नड्डा यांनी या पत्राद्वारे मोठा संदेश दिला आहे. यानंतर लोजपा (रामविलास) अध्यक्ष चिराग पासवान यांचा एनडीएमध्ये प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे. BJP president JP Nadda sent invitation letter to NDA meeting by Chirag Paswan

ही बैठक 18 जुलै रोजी नवी दिल्लीतील हॉटेल अशोक येथे संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी चिराग पासवान यांना पत्र पाठवले आहे. यामध्ये त्यांनी एलजेपी (आर) हे एनडीएचे महत्त्वाचे भागीदार असल्याचे नमूद केले आहे. या बैठकीत चिराग पासवान यांच्यासह हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे अध्यक्ष जीतन राम मांझी यांनाही बोलावण्यात आले आहे.

भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी चिराग यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “तुमचा पक्ष लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) एनडीएचा एक महत्त्वाचा भागीदार आहे. सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या विकासाच्या यात्रेतील प्रमुख सहयोगी देखील आहे.

पुढे, चिराग पासवान यांना बैठकीचे निमंत्रण देताना नड्डा यांनी लिहिले आहे की, “NDA ची बैठक मंगळवार, 18 जुलै 2023 रोजी संध्याकाळी 5 वाजता नवी दिल्लीतील हॉटेल अशोक येथे पंतप्रधानांच्या उपस्थितीत निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठी तुम्ही बैठकीसाठी हार्दिक निमंत्रित आहात. NDA ची महत्त्वाची भागीदार म्हणून तुमची भूमिका आणि तुमचे सहकार्य केवळ युती मजबूत करत नाही, तर देशाच्या विकासाच्या प्रवासाला बळ देते. NDA भागीदार पक्षांच्या बैठकीला तुमची उपस्थिती प्रार्थनीय आहे.”

पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ –  चिराग पासवान

जेपी नड्डा यांनी लिहिलेल्या या पत्रावर चिराग पासवान यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले “आम्हाला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे पत्र मिळाले आहे. या बैठकीत लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) राष्ट्रीय अध्यक्ष चिराग पासवान यांना महत्त्वाचे सहयोगी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. आज पक्षाच्या नेत्यांची बैठक घेऊन अंतिम निर्णय होईल.”

BJP president JP Nadda sent invitation letter to NDA meeting by Chirag Paswan

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात