पाटण्यात पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये भाजप पदाधिकाऱ्याचा मृत्यू; राजकीय वातावरण तापले!

नितीश कुमार सरकार मारेकरी असल्याची भाजपाची टीका; भाजपचे बिहार प्रभारी विनोद तावडेंनीही साधला निशाणा

विशेष प्रतिनिधी

पाटणा : येथील गांधी मैदानापासून विधानसभेकडे निघालेल्या मोर्चादरम्यान पाटणा पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांवर लाठीमार, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडण्यात आल्या. परिणामी पोलिसांनी केलेल्य बळाच्या वापरात एका भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. विजय कुमार सिंह हे जेहानाबादचे जिल्हा सरचिटणीस होते. पाटणा पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये ते गंभीर जखमी झाले होते, यामुळे त्यांना रुग्णालयात नेले जात होते, मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. BJP office bearer dies in police lathi charge in Patna The political atmosphere heated up

भाजपा कार्यकर्त्याच्या मृत्यूला पक्षाचे राज्यसभा खासदार सुशील कुमार मोदी यांनीही दुजोरा दिला आहे. दुसरीकडे भाजपचे आमदार संजीव चौरसिया यांनी जेहानाबादच्या सरचिटणीस यांची हत्या झाली असून ही हत्या बिहार सरकारने केली आहे, असा आरोप केला आहे. तर, पाटणाचे एसएसपी राजीव मिश्रा यांनी विजय कुमार सिंह यांना बाहेरून दुखापत झाल्याचे फेटाळले आहे. तर, दुसरीकडे भाजप आमदार विनय बिहारी यांनी सांगितले की, तेही विजय कुमार सिंह यांच्यासोबत उपस्थित होते आणि पोलिस आणि विजय सिंह यांच्यात झटापट झाली होती.

त्याचवेळी भाजपचे बिहार प्रभारी विनोद तावडे यांनी लाठीचार्जच्या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करताना नितीश सरकारला घेरले आहे. विनोद तावडे यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, नितीश सरकारने पूर्वनियोजित पद्धतीने भाजप मोर्चासाठी आलेल्या कार्यकर्त्यांवर पाणी, अश्रूधुर आणि लाठीमार करण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे शांततापूर्ण मोर्चावर लाठ्यांचा वर्षाव करणे ही उघड गुंडगिरी आहे आणि आज बिहारची जनता नितीश कुमार आणि तेजस्वी लालू यादव यांच्या या गुंडगिरीने त्रस्त आहे.

BJP office bearer dies in police lathi charge in Patna The political atmosphere heated up

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात