विशेष प्रतिनिधी
मुंबई :Navnath Ban छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना रिकाम्या खुर्च्यांमुळे हंबरडा फोडण्याची वेळ आली होती. शेतकऱ्यांच्या नावावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न उबाठा गटाने केला आहे.पण मराठवाड्यातील शेतकऱ्यांना देवाभाऊ यांनी मदत केल्याने त्यांनी मोर्चा कडे पाठ फिरवली त्यामुळे रिकाम्या खुर्च्यांमुळे हंबरडा फोडण्याची वेळ आली, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. त्यामुळे हंबरडा मोर्चाची भाषा राऊतांनी करू नये.Navnath Ban
नवनाथ बन म्हणाले की, पगारी नेते संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या घोटाळ्यांवर किंवा मतचोरीवर बोलू नये. मत चोरी नाही तर तुमची मती चोरीला गेली आहे. लोकसभा निवडणुकीत मविआचे 30 खासदार निवडून आले तेव्हा तुम्ही मतचोरी केली का? की निवडणुकीत घोटाळा करत निवडून आले का? याचे उत्तर तुम्ही आधी द्या. राऊत राहुल गांधी आणि नक्षलवाद्यांची भाषा बोलत आहेत. लोकसभेला सर्वात जास्त जागा उबाठाने जिंकल्या तेव्हा मतचोरी नव्हती, निवडणूक आयोग चूक नव्हते. आणि विधानसभेला देवेंद्र फडणवीस आणि भाजपला लोकांनी निवडून दिले हे तुमच्या पोटात दुखत आहे. खरंतर राहुल गांधी मतचोरी म्हणून ओरडत आहेत पण मतीचोरीला गेली आहे. तुमचा भाऊ निवडून आला तिथे मतचोरी झाली नाही का? असा सवाल बन यांनी केला आहे. लोकसभेला किती मतचोरी केली हे राऊतांनी सांगावे.Navnath Ban
..म्हणून जनतेने तुम्हाला नाकारले
नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत यांनी शिष्टमंडळ घेऊन निवडणूक आयोगाकडे जाऊ नये तर जनतेमध्ये जावे. जनतेला विचारावे की आम्हाला का पराभूत करावे. सातत्याने घरात बसून राहायचे, आणि जनतेला लुटायचे आणि जनतेने तुम्हाला नाकारले की मग निवडणूक आयोगाच्या नावाने ओरडायचे हे तुमचे जुने धंदे झाले आहेत. अडीच वर्ष जनतेला लुटले, घरात बसले म्हणून जनतेने तुम्हाला नाकारले आहे. जनतेमध्ये गेलात तर ते तुम्हाला का नाकारले सांगतील.
जनता तुमचा पराभव करणार
नवनाथ बन म्हणाले की, पगारी नेते संजय राऊत म्हणत आहेत की नोव्हेंबर महिन्यात भूकंप होईल. तो भूकंप हा मविआच्या पराभवाचा असेल. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये उबाठाच्या पराभवाचा असेल. संजय राऊत यांच्या सर्व सहकाऱ्यांचा पराभव सर्व नागरिक करणार आहेत. उबाठा हा सोनिया गांधी यांची बेनामी कंपनी आहे हे सर्व जनतेला माहिती आहे. जनता तुम्हाला जागा दाखवून देतील.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App