राजस्थानात भरतपूरच्या खासदार रंजिता कोली यांच्या निवासस्थानाबाहेर गोळीबार, जिवंत काडतुसे आणि धमकीचे पत्र!!

वृत्तसंस्था

भरतपूर : राजस्थानात भरतपूरच्या भाजप खासदार रंजिता कोली यांच्या निवासस्थानाबाहेर काल गोळीबार झाला तसेच तेथे काही जिवंत काडतुसे सापडली आहेत. रंजिता कोली यांना धमकीचे पत्रही आले आहे.BJP MP Ranjeeta Koli yesterday claimed that some unidentified persons fired shots outside her residence

यासंदर्भात खासदार रंजिता कोली यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून त्याची दखल राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी घेतली आहे. अशोक गेहलोत आणि रंजिता कोली यांच्याशी फोनवरून बातचीत केली आणि त्यांना सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासन दिले आहे.

त्याच वेळी खासदार रंजिता कोली यांनी राजस्थानातील घसरत्या कायदा-सुव्यवस्थेचा उल्लेख करून या धमकीच्या पत्राची केंद्र सरकारने दखल घेतली आहे, अशी माहिती दिली.

रंजिता कोली यांना यापूर्वीही अशी धमकी आलेली आहे. याबाबत मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट करून सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेची हमी सरकार घेईल, अशी ग्वाही दिली आहे. त्याच बरोबर धमकी देणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करून अटक केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

BJP MP Ranjeeta Koli yesterday claimed that some unidentified persons fired shots outside her residence

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात