वृत्तसंस्था
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील इटावाचे भाजप खासदार राम शंकर कठेरिया यांना 2011 मधल्या एका प्रकरणात 2 वर्षांची शिक्षा झाली असून त्यामुळे त्यांच्यावर खासदारकी गमावण्याची पाळी आली आहे.BJP MP Ram Shankar Katheria gets 2-year jail in 2011 assault case, likely to be disqualified from LS
टोरंट अधिकाऱ्याला मारहाण आणि मॉलमध्ये तोडफोड या 2011 च्या प्रकरणात राम शंकर कठेरिया यांना न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली. त्यामुळे त्यांच्यावर खासदारकी गमावण्याची पाळी आली आहे. राम शंकर कठेरिया हे माजी केंद्रीय राज्यमंत्री देखील आहेत. दोन वर्षांच्या तुरुंगवासाबरोबरच त्यांना 5000 रुपये दंडही न्यायालयाने ठोठावला आहे.
हे प्रकरण असे :
6 नोव्हेंबर 2011 रोजी टोरंट पॉवर लिमिटेडच्या साकेत मॉलमध्ये कार्यालयाचे मॅनेजर भावेश रसिकलाल शाह हे वीज चोरी संदर्भातल्या मामल्याचा निपटारा करत होते. त्याचवेळी स्थानिक खासदार असलेले राम शंकर कठेरिया हे त्यांच्या समर्थकांसह मॉलमध्ये घुसले आणि कार्यालयात जाऊन त्यांनी भावेश रसिकलाल शाह यांना मारहाण केली. या मारहाणीमुळे शाह यांना गंभीर जखमा झाल्या. त्याचवेळी कठेरिया समर्थकांनी मॉलमध्ये तोडफोड देखील केली.
या प्रकरणावर आज न्यायालयाने राम शंकर कठोरिया यांना 2 वर्षे तुरुंगवासाची आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा फार्मावली. लोकप्रतिनिधित्वाच्या नियमानुसार आता कठेरिया यांची खासदारकी जाणार आहे.
*राहुल गांधींनी गमावली खासदारकी
न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली की संबंधित लोकप्रतिनिधीचे आमदारकी अथवा खासदारकी जाते याचा फटका राहुल गांधींना देखील बसला होता. पण सुप्रीम कोर्टाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यामुळे राहुल गांधींना खासदारकी पुन्हा बहाल करण्याचे घाटत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप खासदाराला शिक्षा होणे आणि खासदारकी गमावण्याचा धोका उत्पन्न होणे ही बाब राजकीय दृष्ट्या महत्त्वाची आहे.*
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App